Dailyhunt
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका

शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका

ABP माझा 3 days ago

पुणे:महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे (Pune) शहरात शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचं समोर आलं आहे, कारण एक-दोन नाही तर तब्बल 13 शाळा बोगस असल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे महानगरपालिकेने स्वतः शहरातील 13 बोगस शाळांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे जाहीर झालेल्या या संपूर्ण शाळांची नावे एकदम फर्स्ट क्लास असून काही इंग्रजी तर काही मराठी माध्यमातल्या शाळा आहेत. त्यामुळे, यापुढे या तेरा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नका, असे आवाहन पुणे महानगरपालिकेनं (Pune mahapalika) केलं आहे. तर, विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असाही इशारा महापालिकेनं दिला आहे.

शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्यातच 13 बोगस शाळा असल्याची यादी पुणे महानगरपालिकेने आज जाहीर केली आहे. या तेरा शाळांमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये असा आवाहनही परिपत्रक काढून पुणे महानगरपालिकेने केले. या शाळांची नाव बघितली तर संपूर्ण इंग्रजी आणि लॅविश नावं दिसत आहेत. मात्र, या शाळा बोगस असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळांनी शिक्षणाचा खेळ खंडोबा मांडलाय का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, एकीकडे शैक्षणिक पंढरी म्हणून देशात नाव असलेल्या पुणे शहरात जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, या पुणे शहरातील शिक्षणाचा पायाच ढिसाळ झाल्याचं या 13 बोगस शाळांच्या उघड होण्याचे दिसून आलं आहे.

पुण्यातील बोगस 13 शाळांची यादी

1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलिस स्टेशन जवळ विमलविहार समोर, चितामणी नगर,
2. महात्मा गांधी प्रशाला प्लॉट नं.५२, लेन नं.२B संजय पार्क, येवलेवाडी, पुणे
3. टीएम तखवा इस्लामिक स्कूल अँड मदरसा, स.न. ७०/१/१, NIBM रोड कोंढवा बु पुणे-४११०४८
4. सेंट क्यूटू इंटरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
5. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड हडपसर पुणे-२८
6. आनंदाशा अकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोणीकालभोर पुणे
7. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल मानाजी नगर नरे, पुणे
8. लेजसी हाय स्कूल अशोक नगर कोंढवा बु पुणे
9. शिवाली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अशोक नगर कोंढवा बु पुण
10. ऑलिव्ह व इंटरनॅशनल स्कूल, उंडी ता. हवेली पुणे
11. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोसरवाडी कोंढवा पुणे
12. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, औंधवा बु पुणे
13. आयर्न वर्ल्ड स्कूल, उंडी पुणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha