Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shamita Shetty: '...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?

Shamita Shetty: '...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?

ABP माझा 1 week ago

Shamita Shetty Reply to Trolls About Age and Marriage: बॉलिवूड अॅक्ट्रेस शमिता शेट्टीची (Shamita Shetty) जादू सिनेमात चालली नाही, मात्र, सोशल मीडियात (Social Media) अभिनेत्री प्रचंड अॅक्टिव्ह असते.

अनेकदा अभिनेत्री आपले स्पष्ट मत मांडत असते. अलिकडेच अभिनेत्री (Entertainment) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, आता चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. अभिनेत्रीला तिच्या वयावरुन हिणवण्यात आलं होतं. तसेच तिला सिंगल स्टेटसवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं कमेंटचे स्क्रिनशॉट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.

शमिता शेट्टीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर (Shamita Shetty on trollers)

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी 47 वयातही सिंगल आयुष्य जगत आहे. अलिकडेच इंटरनेटवर अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. तिला तिच्या वयावरुन आणि सिंगल स्टेट्‍सवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, ट्रोलर्सना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच तिनं स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. शमिता शेट्टीला पंकज मित्तल नावाच्या एका युझरने ट्रोल केलं होतं. तिनं त्याला अनफॉलो करायलाही सांगितले आहे.

शमिता शेट्टीला वय आणि लग्नावरुन ट्रोल करण्यात आलं (Shamita Shetty reacts to single status trolling)

'तुझं वय झालं आहे. तुझ्यात आता पहिल्यासारखी गोष्ट राहिलेली नाही', अशी एकाने अभिनेत्रीला कमेंट केली होती. या कमेंटवर शमिताने सडेतोड उत्तर देत म्हटलं की, 'हां. माझं रंग - रुप बदलेल. काळाबरोबर गोष्टी बदलतात. हा जीवनाचा एक नैसर्गिक नियम आहे. काहीही कायम टीकत नाही. अगदी बाह्य रुपसुद्धा. पण माझ्या वयानुसार, मी निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी आहे. तसेच देवाने मला जे काही दिलं आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे', असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'जर लग्न वेळेत झालं असतं, तर आज तुमची मुलं मोठी झाली असती', या कमेंटवरही शमिताने प्रतिक्रिया दिली आहे. संतापलेल्या शमिताने युझरला विचारले की, 'भाऊ; लग्न करुन तू काय मिळवले आहेस? मुळात, तू आमच्या वयावरुन लाजवण्यासाठी आणि तुझी पुरुषप्रधान विचारसरणी आमच्यावर लादण्यासाठी आम्हा अविवाहित महिलांना का फॉलो करतो आहेस? प्लीज मला लवकर अनफॉलो कर', असं शमिता म्हणाली.

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha