Shani Dev: शनिदेव... या नावाचा फक्त उल्लेख जरी झाला, तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मदाता म्हटले जाते, कारण ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात.
तर शनिदेवांच्या आशीर्वादाने, काही विशेष राशींच्या लोकांना जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार, आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांना शनिदेवांकडून विशेष आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्यांना जीवनात खूप काही साध्य करण्याची क्षमता प्राप्त होते.
'ही' रास शनिदेवांची आवडती..! (Lord Shani Favourite Zodiac Signs)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशी ही शनिदेवांच्या सर्वात आवडत्या राशींपैकी एक आहे, कारण या राशीचे स्वामी शनिदेव आहेत. या राशीचे लोक खूप मेहनती आणि उद्योगी असतात. हे लोक शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक प्रयत्नात यश मिळवतात. इतकेच नाही, तर त्यांच्या जीवनात संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची कमतरता भासत नाही.
'या' राशीवर शनिची विशेष कृपा!
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ रास ही देखील शनिदेवांची आवडती रास मानली जाते, कारण या राशीचे स्वामी शनिदेवच आहेत. कुंभ राशीचे लोक केवळ दयाळूच नाही, तर ते खूप प्रामाणिकही असतात. या लोकांना शनिदेवांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
'या' राशीला शनिकृपेने सुख-समृद्धीचा आनंद मिळतो...
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव तूळ राशीच्या लोकांवरही विशेष कृपा करतात. तूळ ही शनिदेवांची उच्च रास आहे. शनिदेवांच्या आशीर्वादाने, या राशीत जन्मलेले लोक कठीण परिस्थितीलाही धैर्याने सामोरे जातात आणि त्यावर मात करतात. इतकेच नाही, तर त्यांच्या आशीर्वादाने हे लोक प्रत्येक कार्य पूर्ण करण्यास सक्षम असतात.
'या' राशीवर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांनाही शनिदेवांचा विशेष आशीर्वाद मिळतो. या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहे, जो शनिदेवांचा मित्र आहे. परिणामी, शनिदेवांच्या आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते.
'या' राशीला शनिकृपेने अनपेक्षित आर्थिक लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीलाही शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो, कारण गुरु हा या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि शनि व गुरु यांना मित्र मानले जाते. शनिदेवांच्या आशीर्वादाने धनु राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
ही वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

