Shani Uday 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev)कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनिचं संक्रमण आयुष्यात शिस्त, संघर्ष आणि धैर्याची शिकवण देतं. शनि प्रत्येकाला मेहनत, जबाबदारी आणि कर्मानुसार फळ देतो.
तसेच, शनि जवळपास अडीच वर्ष एका राशीत स्थित असतात. त्यानंतर तो दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या शनी मीन राशीत संक्रमण करतोय, तर 22 एप्रिल 2026 रोजी तो उदय होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळणार आहे. मात्र, वृषभ, मिथुन आणि मकर राशीच्या (Zodiac Signs) लोकांसाठी हा काळ फार लाभदायी असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, जर तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा खाल फार शुभकारक असणार आहे. घरात सुख-शांती टिकून राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय फार लाभदायी ठरणार आहे. या काळात शनि तुमच्या कर्मभावात असणार आहे. यामुळे तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनावर याचा सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन आणि पगारात वाढ मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तसेच, जे लोक नोकरी बदलीचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope
मकर राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात शनिचा उदय होणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

