Shani Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता आणि न्यायदेवता शनिदेवाची (Shani Dev) चाल लवकरच बदलणार आहे. द्रिक पंचांगानुसार, शनि देव 27 जुलै 2026 रोजी वक्री होणार आहे. याचाच अर्थ मीन राशीत शनि उलटी चाल चालणार आहेत.
त्यानंतर 11 डिसेंबरपर्यंत शनि याच अवस्थेत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिचं वक्री होणं तीन राशींच्या लोकांसाठी चिंताजनक ठरणार आहे. या काळात तीन राशींच्या (Zodiac Signs) लोकांना फार सावधानतेने जगण्याची गरज आहे.
मेष रास (Aries Horoscope)
शनिची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर छोट्या मोठ्या कारणांवरुन तुमचे वाद होऊ शकतात. तुमची अनेक कामे या कालावधीत पूर्ण होणार नाहीत. वैवाहिक जीवनात देखील अनेक समस्या उद्भवू शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनिची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी नुकसानकारक ठरणार आहे. या काळात पैशांच्या गुंतवणुकीपासून सावध राहा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला थोडेफार अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एकाग्रता राहणार नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
शनिच्या वक्री चालीचा परिणाम मीन राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात अनेक अडथळे उद्भवू शकतात. तसेच, मित्रांबरोबर तुमचे विनाकारण खटके उडू शकतात. घरातील वातावरण बिघडू शकतं. त्यामुळे तुम्हाला संयमाने काम करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या मेहनतीला देखील यश येणार नाही.
'हे' उपाय करा
शनिच्या वक्री चालीनंतर काही खास उपाय केल्यास तुम्हाला थोडाफार फायदा मिळू शकतो. यासाठी प्रत्येक शनिवारी ऊॅं शं शनेश्चराय नम: या मंत्राचा तीन वेळा जप करा. तसेच, शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. याच्या भोवती सात वेळा परिक्रमा करा. तसेच, गरिबांना दान करा. अन्याय करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

