Shani-Budh Yuti 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि-बुध ग्रहाची युती (Shani-Budh Yuti)तशी चांगलीच मानली जाते. कारण बुध ग्रह हा बुद्धीचा कारक देवता आहे. तर, शनि हा न्यायप्रिय ग्रह आहे.
त्यामुळे या ग्रहांच्या युतीने आयुष्यात यशाचे, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. धनलाभ होतो. त्याचप्रकारे, येत्या 11 एप्रिल 2026 रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, याच राशीत शनि आणि बुध ग्रहांचं महामिलन म्हणजेच युती होणार आहे. त्यामुळे या ग्रहांच्या युतीने कोणकोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात.
पुढचे 20 दिवस या 4 राशींची चांदीच चांदी
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनि-बुधाची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदानासारखी ठरणार आहे. पुढचे 20 दिवस या राशींचे अगदी भाग्याचे असतील. या कालावधीत उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, अनेक काळापासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
शनि-बुध ग्रहाची युती तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याची ठरणार आहे. या कालावधीत तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. या काळात तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. तसेच, अनेक माध्यमांतून तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच, हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनि -बुधाची युती कन्या राशीचं नशीब पालटणारी आहे. या काळात तुमच्यासाठी अनेक नशिबाची दारं उघडतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी ही युती भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली बरकत पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

