Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित

शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित

ABP माझा 1 month ago

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा संस्थापक शरद पवार यांनी आज विधिमंडळात अनेक वर्षानंतर प्रवेश केला, सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांच्या स्वागताला दिग्गज नेत्यांची, आमदारांची फौज पाहायला मिळाली.

 शरद पवारांच्या स्वागताला माध्यमांचे कॅमेरे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिमंडळ परिसरातबाहेरच त्याच्या गाडीबाहेर गर्दी पाहायला मिळाली.

शरद पवार यांनी यापूर्वी 1996 मध्ये अधिवेशन काळात विधानभवन सभागृहात एका विषयांसदर्भात बैठकीसाठी हजेरी लावली होती.

त्यानंतर, 6 वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकांच्यावेळी अर्ज भरतानाही त्यांची विधानभवनात उपस्थितीत होती, तेव्हा महाविकास आघाडीकडून त्यांनी राज्यसभेचा अर्ज भरला होता.

आज शरद पवारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, उत्तम जानकर, अभिजीत पाटील, राजू खरे, नारायण पाटील, बापू पठारे उपस्थित होते

यासह संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या स्वागताला उपस्थिती दर्शवली होती, विधिमंडळात येताच हात तोडून त्यांनी लिफ्टजवळ शरद पवारांचे स्वागत केले.

बेळगाव सीमा प्रश्नी विधीमंडळात आज उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित आहेत.

खासदार नारायण राणे देखील विधिमंडळात पोहोचले असून त्यांच्या स्वागताला त्यांचे दोन्ही आमदार पुत्र उपस्थित होते, त्यापैकी नितेश राणे मंत्री आहेत.

दरम्यान, यापूर्वी 11 मार्च 202 मध्ये शरद पवार विधानभवनात गेले होते, 26 मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होत होत्या.

तेव्हा महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.

शरद पवार हे थरथरत्या हातांनी आणि सोबतीला आधार घेऊन विधानभवनात पोहोचले आहेत.

शरद पवारांसोबत अनेक आमदार, नेतेमंडळी देखील त्यांच्या अवतीभोवती दिसून आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमवेत बेळगाव सीमाप्रश्नी त्यांची बैठक सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha