Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

ABP माझा 1 week ago

Eknath Shinde Meets Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी अनेक नेते पोहोचले.

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पवार साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बेळगाव सीमा प्रश्नी विधीमंडळात आज उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तत्पूर्वी, विधानभवन परिसरात आगमन झाल्यानंतर शरद पवारांच्या स्वागतासाठी अनेक मंत्री आमदार पोहोचले.

आमदारांसोबत बैठक, रोहित पवार गैरहजर

दरम्यान, सीमा प्रश्नाव बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते. जवळपास अर्धा तास आमदारांसोबत बैठक पार पडली. मात्र, मुंबईत असून देखील रोहित पवार बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय भूवया उंचावल्या. दुसरीकडे, मुंबईत शिक्षकांचे आझाद मैदानात भर पावसात आंदोलन सुरू आहे. विधानभवनात शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सरु असताना दुसरीकडे आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाला रोहित पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला. रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत आपण शिक्षक आंदोलनाला उपस्थित राहणार आहोत. मात्र, शरद पवार विधिमंडळात येणार असल्याने आपण उशिरा आंदोलन स्थळी पोहोचू अस म्हंटलं होतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha