Shekhar Suman on PM Modi: गेल्या अनेक महिन्यांपासून रुपया घसरून घसरून धारातीर्थी होत आला आहे. रुपयांचे अवमुल्यन सुरुच असल्याने आता स्टँडिग काॅमेडी अभिनेता शेखर सुमनने खोचक टिप्पणी करताना पीएम मोदी यांना टोला लगावला आहे.
मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडी किंमत वाढवलीत, माननीय मोदीजी तसाचा रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल, अशा शब्दात टोलेबाजी केली आहे. शेखर सुमनचे व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत.
काय म्हणाला शेखर सुमन?
शेखर सुमन म्हणाला की, आठवतंय का, जेव्हा मोदीजींनी झालमुरी खाल्ली होती, आठवतंय? न्यूज अँकर्सनी झालमुरीचा संपूर्ण इतिहास सांगितला होताआणि आता.. मेलोनीला मेलडी खाऊ घालून मेलडीची किंमत वाढवली. आमची आमच्या आदरणीय, सन्माननीय, आदरणीय मोदीजींना एकच विनंती आहे की, सर, हे करत असताना हातात एक रुपया घेऊन एक फोटो काढून घ्या, कुणास ठाऊक रुपयाची किंमतही वाढेल! पूर्वी, जेव्हा रुपया घसरला तेव्हा भारत सरकार जबाबदार होतं. आजही, जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा सरकार जबाबदार असतं, अमेरिका!
वास्तविक पाहता, आपण सर्वच झुरळे आहोत
शेखर सुमनने काॅकरोचवरूनही टोलेबाजी केली. शेखर सुमन म्हणाला की, अलीकडेच, भारतातील बेरोजगार तरुणांना 'झुरळे' म्हटले गेले, ज्यामुळे देशातील तरुण संतप्त झाले. वास्तविक पाहता, आपण सर्वच झुरळे आहोत. अन्न भेसळयुक्त आहे, श्वास घेण्यास अडथळा येतो, सगळीकडे कचरा आहे, व्यवस्था सडलेली आहे. हे सर्व असूनही, जर आपण अजून जिवंत आहोत, तर आपण झुरळेच आहोत.
राष्ट्रकवी दिनकर म्हणाले होते, "सिंहासन सोडा, कारण जनता येत आहे." नाहीतर तरुण म्हणतील, "रस्ता मोकळा करा, कारण झुरळे येत आहेत." एवढेच नाही, तर झुरळ जनता पक्षाचे 'X' नावाचे ट्विटर अकाउंटसुद्धा बॅन करण्यात आले. आता हे तर अपेक्षितच होते. म्हणून त्यांनी लगेच दुसरे अकाउंट तयार केले. अहो, तुम्हाला हे कळत नाही का? झुरळांना अणुबॉम्बनेही मारता येत नाही, आणि तुम्ही त्यांची अकाउंट्स बंद करून त्यांना संपवू पाहताय?
इतर महत्वाच्या बातम्या
Author : परशराम पाटील, एबीपी माझा

