AgricultureNews:राज्यातील शेतकऱ्यांसाठीदिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढदिली आहे.
हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिकटन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिकटन हरभरा खरेदी करता येणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने होत होती. य़ा मागणीचा विचार करुनसरकारनंमुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढमिळवून दिल्याची माहिती पणनमंत्रीजयकुमाररावल यांनी दिली आहे.
आतापर्यंत 37 हजार 801 शेतकऱ्यांकडून 6 लाख 82 हजार 37 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली
सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून, 1 मेपर्यंतचा कालावधी आता 31 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.हरभरा खरेदीला 1 मार्च 2026 पासून सुरुवात झाली होती. आधी 29 एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 7 लाख 61 हजार 250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन करण्यात आले आहे.
Author : एबीपी माझा वेब टीम

