मुंबई : अखेर शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार ठरले असून काही वेळेत दोन्ही उमेदवार उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत दोन्ही नेते विधान भवनात अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहेत, पक्षप्रवेशानंतर आज शिवसेनेकडून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सुरूवातीपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आज या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते आता आपला उमेदवारी अर्ज भरत आहे.
बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी दोन्ही नावे जाहीर केली आहे, त्यांनी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे जाहीर केली, त्याचबरोबर माझं सगळ्यांवर लक्ष असतं, सगळ्यांना संधी मिळेल, माझं सगळ्यांवर लक्ष असलतं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवार यादी
भाजप
१. सुनील कर्जतकर
२. माधवी नाईक
३. संजय भेंडे
४. विवेक कोल्हे
५. प्रमोद जठार
६. प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस
७. झिशान सिद्दीकी
शिवसेना
८. बच्चू कडू
९. निलम गोऱ्हे
महाविकास आघाडी
१०. अंबादास दानवे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
Congress: एका अटीवर या निवडणुकीत काॅंग्रेस माघार घेण्याची शक्यता
पुढील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी काँग्रेसची अट असण्याची शक्यता आहे. या अटीवर काँग्रेस या निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ठाकरे गटाला ही अट मान्य झाल्यास काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार- (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Vidhan Parishad Election 2026)
- उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात- (Vidhan Parishad Election 2026)
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)
- भाजपा- 132 - 1 = 131
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जनसुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
- अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
- महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
- मविआ = 16+10+20+2+1 = 49
- इतर = 03
- एकूण = 286 आमदार
Author : सुरज सावंत

