Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...

ABP माझा 1 week ago

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (2 सप्टेंबर) दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing) होणार आहे.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या जोरदार युक्तिवादानंतर आजपासून शिंदे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. आजपासून शिवसेनेकडून मुकुल रोहतगी, निरज किशन कौल हे युक्तीवाद करतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाची बाजू आणि पुरावे भक्कम रीतीने मांडण्यासाठी सर्व वकिलांशी आणि कायदे तज्ञांशी चर्चा केली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादानंतर शिंदे गटाकडून आजपासून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच हा युक्तिवाद करत असताना पक्षाची बाजू आणि पुरावे भक्कम रीतीने मांडण्यासाठी काल दिल्लीत एकनाथ शिंदे सर्व वकिलांशी आणि कायदे तज्ञांशी चर्चा केली. पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे राहावे यासाठी कायद्याच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात यावी असा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे. यासाठी एकनाथ शिंदे काल दुपारनंतर दिल्लीसाठी रवाना झाले होते.

आजच्या सुनावणीआधी एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Eknath Shinde On Shivsena Name And Symbol Hearing)

निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' गोठवण्याची मागणी करणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. 'धनुष्यबाण' हे आमचे 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. ते चिन्ह गोठवण्याची मागणी करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुसून टाकण्याचा, महाराष्ट्रातील जनतेचा कौल गोठवण्याचा आणि हिंदुत्व गोठवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. विरोधी पक्षाने केलेली ही मागणी अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. 2019 मध्ये ज्यांनी त्यांची विचारधारा सोडली, त्यांनी जनतेने दिलेला कौलही नाकारला आणि मोडला. आज 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. ते चिन्ह गोठवण्याची न्यायालयात मागणी करणे हा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या सर्व शिवसैनिकांचा अपमान आहे आणि त्यांच्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

आजपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तीवाद- (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)

महाराष्ट्रातील सद्यस्थितीची तुलना करत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाची मागणी मांडली आहे. कथित बंडखोरी आणि पक्षांतराच्या आधारे मिळालेलं धनुष्यबाण पक्षचिन्ह हे केवळ तथाकथित विधिमंडळ बहुमतावर आधारित असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. संबंधित आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही, याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयानेच करावा, अशी मागणी कामत यांनी केली. न्यायालयानं पक्षांतर झाल्याचं ठरवल्यास, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देताना मानलेला मूळ आधारच संपुष्टात येईल, असाही दावा त्यांनी केला.या आणि आक्रमक मुद्द्यांसह ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरील युक्तिवाद पूर्ण केला. आता शिंदेंच्या शिवसेनेकडून या प्रकरणावर 2 सप्टेंबरला युक्तीवाद होणार आहे.

ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचाही जोरदार युक्तिवाद- (Shivsena Symbol Verdict)

विधानसभा अध्यक्षांनी ही केस योग्य प्रकारे हाताळली नाही. आमदारांनी मूळ पक्षातून फुटण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला होता, ते सगळे आमदार हे अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी चुकीचे निर्णय दिल्यानंतर ते निर्णय अनेकदा न्यायालयाने फिरवल्याचे अनेक दाखले देवदत्त कामत यांनी दिले. निवडणूक आयोगाने विधिमंडळ बहुमताच्या आधारे शिंदेंच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं. मात्र पक्षांतरबंदीच्या कायद्यान्वये ते सगळेच आमदार अपात्र ठरतात. त्यांनी पक्षत्याग जरी केला असला तरी ते अपात्र न ठरता, चिन्हाच्या आधारे लाभ उपभोगत आहेत. ते चिन्ह त्यांना मिळालं ते फक्त विधिमंडळातील बहुमताच्या आधारे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी त्यावेळी पक्षत्याग केला की नाही याचा कायमचा निर्णय घ्यावा. त्यांनी जर पक्षत्याग केला असेल हे सिद्ध झाले तर आजही न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकतं आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आधारच निष्ट होईल, असा मोठा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

आतापर्यंत कोर्टात काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing)

  • 2018 च्या घटनेनुसार ठाकरेंकडे स्पष्ट संघटनात्मक बहुमत
  • बहुमत नजरेआड करण्यासाठी आयोगानं 2018 ची घटना नाकारली
  • पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही
  • संघटनात्मक बहुमत डावलून आयोगानं आमदार संख्येवर दिलेला निर्णय चुकीचा
  • आमदारांचा कार्यकाळ संपला तरी अपात्रतेचा मुद्दा जिवंत
  • 2018 चा घटनाबदल शिंदे गटास लोकशाहीविरोधी वाटतो,मग त्यांची नियुक्तीही अयोग्यच
  • 1999 च्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच नाही
  • आयोगानं थेट पक्षाचं चिन्हच काढून घेणं योग्य नव्हतं
  • स्वत:चं अधिकारक्षेत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं विधानसभा अध्यक्षांकडून उल्लंघन
  • निवडणूक आयोगाकडं कोणती घटना आहे याच्याशी अध्यक्षांचा काय संबंध?
  • 2018 ची शिवसेनेची घटना अयोग्य असं अध्यक्ष कसं म्हणू शकतात?
  • अध्यक्षांनी सादिक अली खटल्याचा आधार घेतला, पण तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच नव्हता
  • राजकीय पक्ष ठाकरेंकडेच होता, त्यात फूट पडलेली नव्हती
  • राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता
  • अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला, मग त्यानुसार तर्क लावले
  • शिंदेंनी नवी पक्षघटना तयार केली नाही, 2018 चीच घटना मान्य केली
  • धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष ठाकरेंचाच, फायदे मात्र शिंदेंनी घेतले
  • धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्या, नाही तर गोठवून टाका
  • विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच बेकायदेशीर
  • अपात्र ठरू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यावर नार्वेकर अध्यक्ष

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha