Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

ABP माझा 2 weeks ago

मुंबई : राज्यभरातील राम मंदिर आणि हनुमान मंदीरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीराम मंदीर लुटीविरोधात रामरक्षा महाआरतीचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह म्हणत रामरक्षा महाआरतीचं आयोजन केलं जाणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पहिल्या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

दादर पश्चिम येथील हनुमान मंदीरात महाआरीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

रविवारी दादर पश्चिम येथील हनुमान मंदीरात ठाकरेंच्या सेनेकडून रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाआरीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. श्रीराम मंदीर लुटीच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता राज्यभर ठाकरे गटाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह म्हणत रामरक्षा महाआरतीचं आयोजन केलं जाणार आहे.

उद्या दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, संजय राऊतांनी दिली माहिती

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील एक व्टीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एल्गार असं म्हटलं आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात त्यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे हे शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी म्हणजे उद्या लाडेबारा वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय सांगणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत

अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलं आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची 4 किलोची वीट गायब झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधूसंताच्या उपस्थितीत एक कोटी रुपये आणि चांदीची वीट दान केली होती. आता यास इतकी वर्षे उलटल्यानंतरही ट्रस्टकडून कोणत्याही प्रकारची पावती आणि माहिती मिळालेली नाही. दान केलेली वीट नक्की कुठे गेली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची हीच वेळ आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.

Author : वेदांत नेब

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha