Shubh Yog 7 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 मे (May 2026)चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंग्राने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला.
आहे. तसेच, आजच्या दिवशी साध्य योग आणि पूर्वाषाढ नक्षत्राचा दुर्लभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस 5 राशींसाठी (Zodiac Signs)फार शुभकारक असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या 5 राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात चांगली गती दिसून येईल. तसेच, नशिबाची साथ देखील लाभेल. या कालावधीत तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकता. मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुम्हाला मित्र मैत्रीणींचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचे लोक आज स्वत:ला फार आक्रमक समजतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल. तसेच, कामांना आधी प्रोत्साहन द्याल. समाजातून काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तसेच, तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा असणार आहे. आज देवी लक्ष्मीचा तुमच्यावर वरदहस्त असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची चणचण जाणवणार नाही. तसेच, उत्पन्नाची अनेक साधने तुमच्यासमोर निर्माण होतील. हातात घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतील. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. लवकरच यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

