Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shubman Gill RCB Vs GT IPL Final : आम्ही तेव्हाच सामना हरलो, जेव्हा... IPLफायनलमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने कोणावर फोडलं खापर?

Shubman Gill RCB Vs GT IPL Final : आम्ही तेव्हाच सामना हरलो, जेव्हा... IPLफायनलमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने कोणावर फोडलं खापर?

ABP माझा 4 months ago

What Did Shubman Gill Say After Losing IPL Final 2026 : आयपीएल 2026च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला (GT) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या फलंदाजीसह गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवले. सामन्यानंतर बोलताना गिल म्हणाला की, गुजरातच्या फलंदाजांनी डावाच्या सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या, ज्याचा संघाच्या धावसंख्येवर मोठा परिणाम झाला. फलंदाजांना अपेक्षित वेगाने धावा करता आल्या नाहीत. जर संघाने 180 ते 190 धावांपर्यंत मजल मारली असती, तर सामना अधिक चुरशीचा झाला असता, असे त्याने सांगितले.

गोलंदाजांबाबत बोलताना गिलने नमूद केले की, पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरले. सुरुवातीच्या षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात संघाला यश आले नाही. त्यामुळे आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना मजबूत पाया रचला आणि अखेर सहज विजय मिळवला. गिलच्या मते, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांतील चुका गुजरातच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. मात्र संपूर्ण हंगामात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून, पुढील वर्षी अधिक ताकदीने पुनरागमन करण्याचा निर्धार संघ करेल, असे संकेत त्याने दिले.

नेमकं काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल? (Shubman Gill RCB Vs GT IPL Final)

कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, "नक्कीच. जर आपण 180-190 च्या जवळपास धावा केल्या असत्या, तर हा एक चांगला सामना झाला असता. सुरुवातीच्या पहिल्या तीन-चार ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मूव्हमेंट होती, आणि आपण सुरुवातीलाच काही विकेट्स गमावल्यामुळे आमचा मोमेंटम बिघडला. आम्ही पॉवरप्लेमध्ये 15-20 धावा जास्त दिल्या. मला वाटतं की आम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या संघांपैकी एक होतो. पहिले दोन सामने हरल्यानंतर आम्ही जोरदार पुनरागमन केलं. मी खूप आनंदी आहे. पण आम्ही आयपीएलची ट्रॉफी (विजेतेपद) जिंकली असती, तरीही काही गोष्टींमध्ये सुधारणेला नेहमीच वाव राहिला असता."

शुभमन गिलची तुफानी कामगिरी... (Shubman Gill IPL 2026 News)

आयपीएल 2026 हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मोसमात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. गिलने 16 सामन्यांमध्ये सुमारे 46 च्या सरासरीने तब्बल 732 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 163.03 इतका प्रभावी राहिला. त्याच्या बॅटमधून संपूर्ण हंगामात एक शतक आणि सहा अर्धशतके झळकली. कर्णधार म्हणूनही गिलने संघासाठी मोठे योगदान दिले आणि गुजरात टायटन्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्याचे आणि संघाचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले.

Virat Kohli RCB Champion IPL 2026 : आरसीबी चॅम्पियन झाली, पण विराटने थेट मुंबई इंडियन्सचं नाव का घेतलं? सलग दुसऱ्या ट्रॉफी जिंकल्यानंतर चेज मास्टर कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha