Shul Yog 2026 : द्रिक पंचांगानुसार, येत्या 14 जून 2026 रोजी शूल योग (Shul Yog) निर्माण होणार आहे. हा योग ज्योतिष शास्त्रात फार अशुभ आणि कष्टकारी योग मानण्यात आला आहे. या काळात शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
मानसिक तणाव वाढतो. शारीरिक कष्ट सोसावे लागतात. हा योग 14 जून रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 15 जून रोजी सकाळी 8 वाजून 56 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दरम्यान ग्रहांची स्थिती आणि संक्रमण विशेष करुन 4 राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शूल योगाच्या प्रभावाने तुमच्या स्वभावात अप्रत्यक्षित आक्रमकता किंवा चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल. घरातील वातावरण तणावाचं असेल. विनाकारण खटके उडतील. तसेच, या काळात पैशांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ नका.
धनु रास (Saggitarius Horoscope)
शूल योगाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: या काळात तुम्हाला डोकेदुखी, पोटदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. यासाठी आरोग्याच्या बाबतीत सतर्कता बाळगा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी देखील हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतंही काम धैर्याने करा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी देखील हा काळ धोकादायक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या कालावधीत कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच, प्रवास करताना, धार्मिक यात्रेला जाताना सावधानता बाळगा.
शूल योगाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी करा हे उपाय
भगवान शंकराची पूजा करा
शूलचा संबंध भगवान शंकराच्या त्रिशूलाशी देखील जोडण्यात आला आहे. या काळात ऊं नम: शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच, शिव चालिसाचे पठण करणं अत्यंत शुभकारक ठरेल.
हनुमान चालिसाचे पठण करा
संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या काळात हनुमान चालिसाचं पठण करणं फायद्याचं ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

