Dailyhunt
सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

सिंधुदुर्गातील घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला; दुर्दैवी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

ABP माझा 2 weeks ago

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाटात सिमेंट्र ट्रक दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
 वैभववाडी येथील करूळ घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळून बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला.

दोघेही विजापूर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ट्रक सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले

स्थानिकांच्या मदतीने अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले

अपघातातील बाप-लेकाच्या मृत्यूच्या घटनेनं उपस्थितांनीही दु:ख व्यक्त केले, तसेच पोलिस यंत्रणांकडून पंचनामा करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha