Sohail Khans Video Viral: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या संबंधित बातम्या आणि व्हिडीओ सोशल मीडियात (Social media) तुफान व्हायरल होतात. तसेच खान कुटुंबाशी संबंधित प्रत्येक बातमी आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो.
अलिकडेच सलमान खानचा भाऊ सोहेल खानची (Sohail khan) प्रचंड चर्चा झाली होती. त्याने वेट लॉस केलं होतं. वेट लॉस केल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. आता सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो वांद्रे येथे आपल्या दोन मुलांसोबत स्पॉट झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सोहेल खान नशेत (Sohail Khan Drunk Video) असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
सोहेल खानचा आपल्या मुलांसोबतचा व्हिडीओ व्हायरल (Sohail Khan Spotted With Sons in Bandra)
खरंतर सोहेल खानचा हा व्हायरल व्हिडीओ 31 ऑगस्टचा असल्याचं म्हटलं जात आहे. 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सोहेल खान आपल्या दोन मुलांसोबत वांद्रे येथे स्पॉट झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये त्याची चाल थोडी अस्थिर दिसत आहे. पापाराझींनी सोहेल खानचे काही फोटो आणि व्हिडीओ शूट केले. तसेच सोशल मीडियात शेअर केले. सोहेल खानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी सोहेल खानने मद्यपान केले होते का? असा सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही सेकंदाच्या व्हिडीओवरुन सोहेल खानने मद्यपान केले होते की नाही? याची पुष्टी करता येत नाही.
सोहेल खान खरंच दारुच्या नशेत होता? (Sohail Khan Spotted With Sons in Bandra is he drunked?)
सोहेल खानसोबत त्याचा मुलगा निर्वाण आणि योगान दिसत आहेत. सोहेलनं आपल्या मुलांसोबत कॅमेऱ्यासमोर पोझ दिले आहेत. सोहेल खान मुलगा निर्वाण यात काहीसा गंभीर आणि अस्वस्थ दिसत होता. तो आपल्या वडिलांवर रागावला आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे उपस्थित केला आहे. यानंतर ते तिघेही वेगवेगळ्या दिशेनं आपल्या चारचाकीकडे जाताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काही जणांनी सोहेल खानच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तर, काहींनी मुलांच्या एक्सप्रेशन्सवर प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, नेमकं खरं काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. सोहेल खानने देखील या व्हिडीओवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

