Dailyhunt
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई

Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई

ABP माझा 1 week ago

Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव येथे पुतळा प्रकरणी आंदोलन सुरू असताना पुतळ्याच्या जागेची मोजणी करायला आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत 'मोजणी करू नका, नाहीतर एक ऐकला बघून घेतो' अशा पद्धतीने धमकावल्यावरून ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा (Shivaji Maharaj Statue) प्रकरणात खेलोबा मंदिर (Kheloba Mandir) जागेच्या मोजणीदरम्यान हाके आणि समर्थकांनी धक्काबुक्की व गोंधळ घातला होता. याप्रकरणी ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur crime news)

अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर धनगर आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ही घटना घडली होती. तब्बल तीन दिवस याठिकाणी धनगर (Dhangar) आंदोलक ठाण मांडून बसले होते. अखेर चौथ्या दिवशी स्थानिक नेते आणि पोलिसांच्या (Madha Police) पुढाकाराने या वादावर तोडगा काढण्यात यश आले होते. त्यानुसार खेलोबा मंदिराच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात दुसरी एखादी जागा शोधून तिकडे स्थलांतरित करण्यात निर्णय घेण्यात आला होता. या पुतळ्याचे स्थलांतर केल्यानंतर त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून तात्काळ 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. (Solapur Latest news)

लक्ष्मण हाके हे अंजनगावातील आंदोलनावेळी त्याठिकाणी ठाण मांडून बसले होते. रातोरात एखाद्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची ही माढा तालुक्यातील पहिलीच घटना नाही, तर 13-14 वी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा कोणताही विरोध नाही. पण धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा का बसवला. पुतळा बसवणाऱ्या समाजकंटकांच्या मनात काय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारी माणसं आहोत. ग्रामस्थ आणि पोलीस हा पुतळा हटवायला तयार झाले होते. मात्र, आमदार अभिजीत पाटील यांनी हा पुतळा स्थलांतरित होऊन दिला नाही. त्यामुळे तो पुतळा तिथेच राहिला, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

मोठी बातमी: राज्यभरात विनापरवाने पुतळे कोण बसवतंय? अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला, एकूण 9 गुन्हे दाखल!

Author : सुनील दिवाण, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha