Dailyhunt
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप

Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप

ABP माझा 1 month ago

Sonali Bendre Goldie Behl News: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि तिचे पती गोल्डी बेहल (Goldie Behl) यांच्या अडचणीत वाढ झालीय.

पुणे (Pune News) जिल्ह्यातील मावळ (Maval News) इथल्या सुमारे 30 गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सेलिब्रिटी कपलवर (Celebrity Couple) करण्यात आलाय.

बॉलिवूडचे (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल यांच्याविरोधात पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात दावा दाखल करण्यात आलाय. मौजे-उकसान येथील सर्व्हे नंबर 121/1 मधील 30 गुंठे जागा परस्पर खरेदी केल्याचा आरोप चंद्रकांत बाळू शिंदे यांनी केलाय. चंद्रकांत शिंदेंचे वकील वनराज शिंदेंनी ही माहिती दिलीये. यामुळं सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र सोनाली बेंद्रे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा, त्यांचे वकील राजू शिंदेंनी केलाय. 1957 पासून ही जमीन माझे आजोबा केसू बाबाजी शिंदेंच्या नावावर आहे, त्यामुळं या जागेवर तक्रारदार चंद्रकांत शिंदेंनी कुळ हक्क दाखवला आहे. मात्र, 1965सालीचं मावळच्या तत्कालीन तहसीलदारांनी केसू शिंदे या जागेचे मालक नाहीत, असं स्पष्ट केल्याचा दावा वकील राजू शिंदेंनी केलाय. केवळ पैसे उकळण्यासाठी सेलेब्रिटी सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्यावर चंद्रकांत शिंदेंकडून हे वारंवार आरोप केले जातायेत. असा प्रतिदावा वकील शिंदेंनी केलाय.

तक्रारदारांचा दावा काय?

कुटुंबाच्या वहिवाटीतील आणि कुळ मालकीच्या 30 गुंठे जमिनीची बेकायदेशीर खरेदी करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत शिंदेंनी दाव्यात केला आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 1957 पासून ही जमीन त्यांच्या आजोबा केसू बाबाजी शिंदे यांच्या नावावर असून, त्या जमिनीवर कुळ हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मूळ मालकाने ही जमीन कथितरित्या बेकायदेशीरपणे बाळा शिंदे नावाच्या व्यक्तीला विकली आणि त्यानंतर कुळ हक्क लपवून ती पुढे सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, डिसेंबर 2025 मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांनी चंद्रकांत शिंदे आणि त्यांच्या आईसोबत वाद घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे. "फक्त खरेदीखत आणि सातबाऱ्यावर नाव असणे म्हणजे मालकी हक्क होत नाही. कुळ हक्क लपवून हा व्यवहार करण्यात आला आहे...", असा आरोप वकील वनराज शिंदे यांनी केला आहे.

सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांचा प्रतिदावा

सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या बाजूनं वकील राजू शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. मुळात सोनाली बेंद्रे यांच्या नावावर ही जमीन नाही, त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. असा दावा वकिलांनी केला. तसेच 8 जून 1965 रोजी मावळच्या तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याबरोबरचं यापूर्वी अनेक वेळा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर अपील करण्यात आले, मात्र प्रत्येक वेळी निर्णय त्यांच्या विरोधात गेला असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. ऑक्टोबर 2025मध्ये मावळच्या तहसीलदारांनी तक्रारदाराचे अपील फेटाळले होते, त्यानंतर पुन्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेलं. केवळ पैसे उकळण्यासाठी वारंवार हे प्रकरण उभं केलं जात आहे..." असा प्रतिदावा वकील राजू शिंदेंनी केलाय. फोनवरुन त्यांनी ही माहिती दिलीये.

फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी

Author : नाजिम मुल्ला, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha