South Cinema Malayalam Actor Santhosh Nayar Dies: एकीकडे थलपती विजयचं (Thalapathy Vijay) तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचं (Tamil Nadu Legislative Assembly Election) यश दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South Indian Film Industry) सेलिब्रेट करत असतानाच आता, दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते संतोष के. नायर (Actor Santosh K. Nair) यांचं निधन झालंय. मंगळवारी सकाळी केरळमधील अडूर इथे झालेल्या एका रस्ते अपघातात संतोष नायर यांचा दुर्दैवी अंत झाला. संतोष हे त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांच्यासोबत प्रवास करत असताना, त्यांच्या कारची एका ट्रकशी टक्कर झाली. या भीषण अपघातात अभिनेत्यानं आपला जीव गमावला आहे, तर त्यांची पत्नी राजलक्ष्मी यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. राजलक्ष्मी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
रस्ते अपघातात संतोष के. नायर यांचा बळी (Actor Santosh K. Nair Death)
संतोष के. नायर हे त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांच्यासोबत प्रवास करत होते. केरळमधील अडूर इथे त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यांच्या कारनं एका ट्रकला टक्कर दिली. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान अडूरजवळील एनाथू इथल्या 'एमसी रोड'वर (MC Road), पुदुस्सेरी परिसरात घडला. अभिनेते संतोष आणि त्यांची पत्नी राजलक्ष्मी हे एका 'इनोव्हा' (Innova) कारमधून प्रवास करत होते. अचानक अभिनेत्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांची कार समोरून येणाऱ्या एका 'पार्सल ट्रक'वर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पुरता चक्काचूर झाला आहे.
ट्रक चालकही गंभीर जखमी (Actor Santosh K. Nair Car Accident)
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अभिनेत्याला आणि त्याच्या पत्नीला बाहेर काढलं. त्यानंतर दोघांनाही जवळच असलेल्या अदूरच्या लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, अभिनेत्याचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. भीषण अपघातात ट्रक ड्रायव्हरही जखमी झाला आहे. अभिनेते संतोष नायर यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनेक फिल्म्स, टेलिव्हिजन शोचा महत्त्वाचा हिस्सा
संतोष के. नायर हे मल्याळम इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून कार्यरत होते. त्याचं फॅनफॉलोइंगसुद्धा मोठं आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये, तसेच अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलंय. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा शेवटचा सिनेमा 'मोहिनीयाट्टम' हा होता, ज्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला. या दुःखद घटनेमुळे त्यांचं कुटुंब, मित्र आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

