Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी

Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी

ABP माझा 6 days ago

Subhash Ghai Salman Khan Fight: सुभाष घई (Subhash Ghai). बॉलिवूड दिग्दर्शकांमध्ये (Bollywood Director) असं एक नाव ज्यांनी सिनेइंडस्ट्रीत सुवर्णकाळ गाजवला होता. 80 आणि 90च्या दशकात त्यांनी ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज करुन बॉलिवूडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं.

त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. आजही सुभाष घई यांचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. 2008 साली प्रदर्शित झालेला सुभाष घई दिग्दर्शित 'युवराज' (Yuvvraaj) या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. 'युवराज' या सिनेमात सुपरस्टार सलमान खानने काम केले होते. त्याची मुख्य भूमिका होती. तो त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत होता. दरम्यान, या सिनेमातील काही रंजक किस्से सुभाष घई यांनी अलिकडेच शेअर केले आहेत.

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत, सुभाष घई यांनी सलमान खानसोबतच्या जुन्या वादाबाबत सांगितले. एकदा या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, अशी माहिती सुभाष घई यांनी मुलाखतीतून दिली. सुभाष घई मुलाखतीत खुलासा करत म्हणाले, या वादानंतर सलीम खान यांनी यात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच सलमान खानला चांगलेच सुनावले. सुभाष घई यांनी मुलाखतीत सांगितले की, 'फिल्म युवराजच्या वेळेस सलमान खानचा भाऊ माझ्याकडे आला होता. तेव्हा त्याचा भाऊ मला म्हणाला होता की, तुम्ही सलमानसोबत सिनेमा का नाही तयार करत? तेव्हा मी त्याला म्हणालो की, सलमान खानला माझ्यासोबत काम करण्यात रस आहे का?'.

'कारण याआधी मी कधीच सलमान खानसोबत काम केलं नव्हतं. तेव्हा त्याचा भाऊ म्हणाला की, हां, त्याला तुमच्यासोबत काम करायचं आहे. यानंतर मी स्टोरी लिहिली. सलमान खानला अशा भूमिकेसाठी कास्ट करायचे होते, जे त्याने यापूर्वीच कधीच साकारले नव्हते, हे चॅलेंज माझ्यासमोर होते. पण फिल्म सुरू होण्यापूर्वीच आमच्यात वाद झाला होता. आमच्यात तेव्हा हाणामारीसुद्धा झाली. त्यानंतर त्यांचे वडील सलीब साहेब, त्याच्यावर रागावले', असं सुभाष घई म्हणाले.

सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात वाद नेमका कशामुळे झाला? (Subhash Ghai Reveals Salman Khan Once Got Into A Fight)

सुभाष घई यांनी त्या दिवशीचा प्रसंग सांगताना म्हटले की, 'आम्ही एका पार्टीत होतो. सलमान खान हा नशेत होता. तो काहीतरी चुकीचं बोलत होता. मी त्याला रोखलं. कदाचित तो माझ्यावर कोणत्यातरी गोष्टीवरुन नाराज असावा. तेव्हा त्याने मला विचारले की, तुम्ही हे का केले? मी म्हणालो की, दिग्दर्शक असल्यामुळे तो माझा निर्णय आहे. यानंतर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवत होतो'.

'या कारणावरुन आमचं भांडण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला सलीम साहेब यांचा फोन आला. तेव्हा सलीम खान म्हणाले की, सलमान खानने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. ते मला म्हणाले होते की, सलमान खानला मी ओरडलो आहे. यानंतर त्यांनी सलमान खानला माझ्या घरी माफी मागण्यास पाठवले. सलमान खानने माफी मागितली. यानंतर माझं त्याच्याप्रति प्रेम आणि सन्मान भावना वाढत गेली. कारण तो आपल्या वडिलांची खूप इज्जत करतो. मी तिथेच विषय सोडून दिला. यानंतर आम्ही एकत्र फिल्म केली', असं सुभाष घई म्हणाले.

इतर बातम्या:

बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

Author : भाग्यश्री कांबळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha