Subodh Bhave On Sai Tamhankar: मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
मराठमोळ्या सई ताम्हणकरनं (Marathi Actress Sai Tamhankar) आजवर अनेक मराठी (Marathi Movie) आणि त्यासोबतच हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Cinema) काम केलंय. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सईनं मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिनं थेट सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण, 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली. गेल्या काही वर्षांत सई अनेक प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. अनेकांकडून तिचं भरभरुन कौतुक होत असतानाच आता मराठीतला सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यानं सईचं तोंडभरुन कौतुक केलंय.
सई इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका होती, असं सुबोध भावेनं म्हटलंय. सई ताम्हणकर (Sai Tamhankar), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांचा 'बोल बोल राणी' (Bol Bol Rani Marathi Movie) हा सिनेमा आलाय. या सिनेमाच्या निमित्तानं त्यांनी नुकतीच कलाकृती मीडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सुबोध भावे यानं सई ताम्हणकरचा मराठीतला सुरुवातीचा प्रवास आणि आताची सई... यावर मनमोकळेपणानं भाष्य केलंय.
मराठी अभिनेता सुबोध भावे सई ताम्हणकरबाबत नेमकं काय म्हणाला? (Subodh Bhave On Sai Tamhankar)
कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुबोध भावे म्हणाला की, "तेव्हा सई ताम्हणकर बाळ होतं. सांगलीहून नुकतंच करिअर करण्यासाठी मुंबईत आलेलं बाळ होतं. तेव्हा आम्ही दोन-तीन प्रोजेक्ट्स केले... एकाची फक्त गाणीच केली आणि तो सिनेमा बंद झाला... मी तेव्हासुद्धा एका सिनेमात काम करत होतो. आम्ही सनई-चौघडेमध्ये एकत्र होतो. सईची ग्रोथ बघून कौतुक वाटतं. चिन्मयबद्दल माहितीच होतं की, तो उत्तम अभिनेता आहे. वादळवाटमध्येही आम्ही एकत्र काम केलंय. त्यामुळे त्याची संवेदनशीलता, त्याचं क्षमता, याबाबत माहिती होती. पण, सई कितपत टिकेल, याबाबतच मला शंका होती. काम वाईट नाही करायची ती, पण तिचा फोकस नव्हता त्या काळात... अचानक जशी श्वास सिनेमानंतर मराठी इंडस्ट्री बदलली ना... तसंच 'दुनियादारी'च्या श्वासनंतर सईचं वेगळं वर्जन आताचं बाहेर आलंय..."
सई ताम्हणकर आता जाणीवपूर्वक सूज्ञपणे काम करतेय... : सुबोध भावे
पुढे बोलताना सुबोध भावे म्हणाला की, "आता सई खूपच फोकस ठेवून काम करते... स्वतःच्या कामाबाबत सूज्ञ असणं, तो जो सूज्ञपणा आलाय ना, तो त्या सिनेमानंतर तिच्यात आलाय... तोपर्यंत ती वाईट काम करत होती का? अजिबातच नाही, ती काम करत होती... आता ती जाणीवपूर्वक सूज्ञपणे काम करतेय, हा तिच्यातला फरक आहे की, ती सूज्ञपणे काम करतेय... "
"आपण सतत आपल्या आधीच्या पिढीतल्या अनेकांची नावं घेतो ना, त्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी ही माणसं आहेत, तसा एक काळ रंजनाने गाजवला, एक काळ जयश्री जयश्री गडकरांनी गाजवला, एक काळ अलकाताईंना गाजवला... मला असं वाटतं की, एका बाजूला मुक्तासारखी अभिनेत्री आहे आणि एका बाजूला सईसारखी अभिनेत्री आहे, तर पुढील काही वर्षात जेव्हा या काळाबद्दल बोललं जाईल तेव्हा या दोघींना गाजवला असं म्हटलं जाईल...", असं सुबोध भावे म्हणाला.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

