बीड : बीडचे पालकमंत्रीपद दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे होते, त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि राज्यात बीडचे नाव पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, पण त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावरती असलेल्या सर्व पदांची जबाबदारी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी स्वीकारली.
उपमुख्यमंत्री पदासोबत बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सुनेत्रा पवारांवर आली. बीड जिल्ह्याचे पालकत्व घेतल्यानंतर पहिल्यांदाच काल (गुरूवारी, ता ३०) सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या, आज महाराष्ट्र दिनी त्यांनी बीडमध्ये ध्वजारोहण केले, त्यानंतर बीडकरांना संबोधित केले. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांनी म्हटलं की, मराठवाडाची भूमी संतांची, वीरांची आहे. संत गोरोबाकाकांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजित दादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ऐतिहासिक आणि निर्णय घेतले आणि तेही अत्यंत कमी वेळामध्ये, बीडसाठी त्यांच्या मनामध्ये अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते आणि ते पूर्ण करण्याच्या मार्गासाठी जे खूप उत्सुक होते आणि त्या संकल्प पूर्तीसाठी ते नेहमीच सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या विकासाच्या वाटचालीमुळे एक नवीन दिशा मिळाल्यासारख मला वाटत होतं आणि त्यांच्या पश्चात पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आली.
महाराष्ट्र दिनाच्या या मंगल दिनी आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात, विकसित सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्यात संकल्प करूया, असा मी आपल्या सुरुवातीलाच सगळ्यांना आवाहन करते. आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आदर्श निर्माण केलेला आहे.,आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते मागच्या दोन दिवसापूर्वीच मुंबईमध्ये विषय सन्मान करण्यात आला, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात आली आहे, विकास प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, युवकांना तंत्रज्ञान आधारित शिक्षण आणि कौशल्य मिळावे यासाठी टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याला एमआयडीसी सुमारे 117 कोटी रुपयांचा आयटी प्रकल्प उभारण्यात येत आहे. 60 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय महिला आणि पुरुष हॉलीबॉल तसेच खोखो स्पर्धांचा यशस्वी आयोजन करण्यात आलेलं होतं. व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा बीडमध्ये होणार आहे. बहु प्रशिक्षित बीड, अहिल्यानगर रेल्वे जिल्ह्यामध्ये धावली. अनेक वर्षांचा बीड त्याचबरोबर बीड अहिल्यानगर, परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला, हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा विकास होणार आहे. जिल्ह्यासाठी 623 कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. आजपासून राष्ट्रीय जनगणनेला प्रारंभ झाला आहे, यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपलं योगदान द्यावं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर राज्य सरकारचे काम सुरू आहे, बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातला अग्रगण्य जिल्हा बनवूया. सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख ठळक करण्याचं आवाहन देखील यावेळी बोलताना सुनेत्रा पवारांनी केलं आहे.

