Dailyhunt
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?

ABP माझा 1 week ago

 बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यात राज्यभरातून राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी, सभागृहात अजित पवारांच्या आठवणींनी अनेकदा भावनिक वातावरण पाहायला मिळालं.

महायुतीच्या उमेदवार असल्याने शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही आवर्जुन उपस्थित होते. या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनीही भावनिक भाषण केलं.

मेळाव्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार पार्थ पवार हेही यावेळी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांचा अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. छगन भुजबळ, धनंजय मुंडेंही आवर्जुन उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील महिला नेत्या प्रामुख्याने सोबत असतात. त्यात, आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर ह्या सतत दिसून येत होत्या.

मात्र, आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत ना रुपाली ठोंबरे होत्या, ना चाकणकर केवळ तीन महिला नेत्या अर्ज भरतेवेळी दालनात दिसून आल्या.

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार सरोज अहिर आणि आमदार सना मलिक या तीन महिला नेत्या उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक कार्यालयात पाहायला मिळाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha