Dailyhunt
Sunil Tatkare On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती...; बारामतीत सुनील तटकरेंचा निर्धार, सुनेत्रा पवारांसमोर भला मोठा संकल्प!

Sunil Tatkare On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती...; बारामतीत सुनील तटकरेंचा निर्धार, सुनेत्रा पवारांसमोर भला मोठा संकल्प!

ABP माझा 1 week ago

Sunil Tatkare On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, चेतन तुपे, सना मलिक, सरोज अहिरे, अनिकेत तटकरे, अंकिता पाटील,व अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, उमेश पाटीलसह अनेक नेते उपस्थित होते.

बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हणाले. सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. पण जर ही निवडणूक लादलीच तर शपथ सांगतो, 1952 पासून निवडणुका होत आहेत, आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात जो कोणी उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आला असेल, त्यापेक्षा जास्त मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणायचा हा संकल्प आपण सर्वांनी करावा, हीच अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असंही सुनील तटकरे यांनी सांगितले. सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती आहे. आज तुम्ही अर्ज भरा...त्यानंतर जसे अजितदादा शेवटची सभा घ्यायचे, तसे शेवटच्या सभेलाच तुम्ही या...अशी विनंतही सुनील तटकरेंनी केली. (Sunil Tatkare On Sunetra Pawar)

काँग्रेसकडून आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणात- (Baramati Vidhan Sabha By Election 2026)

दरम्यान, महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना रिंगणात उतरवून आव्हान कायम ठेवले आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही ही निवडणूक 'अजितदादाच लढवत आहेत' असे मानून सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. आज आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

सुनेत्रा वहिनी विक्रमी मतांनी विजयी झाल्याच पाहिजे, तटकरेंची भावनिक साद, VIDEO:

Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha Byelection 2026: ताफा थांबवला, गाडीतून उतरल्या...सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले, बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी काय घडलं?

Praful Patel On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, प्रफुल पटेलांचं आवाहन; म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो, भेटण्याचा प्रयत्नही केला, पण...

Author : मुकेश चव्हाण

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha