Marathi Actress Sushma Jaywant on Shri Swani Samarth: श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) यांच्यावर अनेकांची श्रद्धा आहे. अनेक कलाकारांनी आतापर्यंत मुलाखतीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांबद्दल सांगितलं आहे.
श्री स्वामी समर्थांच्या प्रचितीबद्दलही सांगितलं. सोशल मीडियावर (Social Media) कलाकारांच्या मुलाखती व्हायरल होतात. अलिकडेच मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत (Sushma Jaywant) यांनी सोनचाफा प्रोडक्शनला मुलाखत दिली होती. मुलाखतीत त्यांनी श्री स्वामी समर्थांबाबत आलेल्या प्रचितीचा जुना किस्सा सांगितला.
मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक जुना किस्सा 'सोनचाफा प्रोडक्शन'ला दिलेल्या युट्यूब चॅनलला सांगितला. यावेळी त्यांनी स्वामींवरच्या श्रद्धेची प्रचिती आल्याचंही सांगितलं.
सुषमा जयवंत यांना आली श्री स्वामी समर्थ यांची प्रचिती (Sushma Jaywant on Shri Swani Samarth Terrifying National Park Incident)
श्री स्वामी समर्थांबाबत बोलताना अभिनेत्री सुषमा जयवंत म्हणाल्या की, "एकदा आम्ही बोरिवलीच्या नॅशनल पार्क येथे लँडस्केपसाठी बोरिवलीला गेलो होतो. तिथे मी माझ्या मैत्रिणींबरोबर गेले होते. तेव्हा लँडस्केप किंवा पेंटिंग करण्याची अजिबात इच्छा नव्हती. मैत्रिणींनी ठरवलं दुसरीकडे जायचं. तेव्हा आम्ही रस्ता चुकलो दुसरीकडेच गेलो. आम्हाला नॅशनल पार्कचा 'N' देखील माहिती नाही. आम्ही खेळत होतो. कपल्स बसले होते. थोड्या वेळाने तिथे एकही कपल नव्हतं. तेव्हा आम्हाला भीती वाटली".
'मी म्हटलं चला, साडेपाचपर्यंत सरांकडे जायचं आहे. 6 वाजेपर्यंत निघायचं आहे. आम्ही जस्ट निघालो, तेव्हा दोन मुलं आमच्यासमोर आली. एकाकडे बंदूक आणि एकाकडे चाकू होता. गावठी पिस्तूल असते ना, तशी पिस्तूल त्याच्याकडे होती. तो आम्हाला म्हणाला की, सोनं अंगावरचं काढायचं आणि कपडेही काढायचे. त्याने फक्त आम्हाला चाकू दाखवला, माझ्या तोंडातून 'स्वामी' हा शब्द निघाला. तेव्हा आमच्या जवळ एका धिप्पाड पुरुषाने शिट्टी मारावी, अशी शिट्टी वाजली. 'सोड तिला' एवढंच ऐकू आलं'.
'तेव्हा तिथे कुणीही नव्हतं. आम्ही तिघी मुली आणि दोन मुलं. अशी एकूण आम्ही 5ही जणं घाबरलो होतो. ते दोघंही मुलं तिथून पळून गेले. मैत्रिणी मला म्हणाले की, चल चल पोलीस असतील. मी म्हटलं की, पोलीस असते, तर समोर असते. कुणीही असतं तर ती व्यक्ती आता आपल्या समोर आली असती. 'तुम्ही आता ओके आहात ना...' असा प्रश्न विचारला असता. तो आवाज कानावर ऐकू आला', असं सुषमा जयवंत यांनी सांगितलं.
'मी मग तेव्हा घरी गेले. माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. वडिलांनी सगळं ऐकलं आणि माझ्या कानाखाली दिली. पहिली गोष्ट म्हणजे सरांना न सांगता तू गेलीच का? असं मला माझे वडील म्हणाले. ही माझी चूक होती. वडिलांनी माझ्या आईला सांगितलं की आपण अक्कलकोटला जात आहोत. आम्ही अक्कलकोटला गेलो. मी कॉलेजमध्ये असताना टॉमबॉय होते. जीन्स घालूनच मी समाधीस्थानाजवळ गेले. समाधीस्थानाजवळ गेले पण मला रोखलं कारण मी जीन्स घातली होती. मी खूप रडले. तेव्हा सहा फुटाचा गोरा उंच ब्राह्मण मुलगा आला तो मला घेऊन आत गेला. कुणीही मला तेव्हा अडवलं नाही. नंतर तो मुलगा मला दिसलाच नाही', असा किस्सा सुषमा जयवंत यांनी शेअर केला.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

