Tamil Nadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभिनेता थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) या पक्षाने राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज मोडीत काढले आहेत.
पहिल्याच निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने 100 हून अधिक जागांवर आघाडी घेत तामिळनाडूत 'किंग' होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या यशामागे महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेच्या (Ladki Bahin Yojana) धर्तीवर विजय यांनी दिलेली 7 मोठी आश्वासने गेमचेंजर ठरल्याचे बोलले जात आहे.
Tamil Nadu Election Result 2026: विजय यांच्या 7 प्रभावी घोषणा
1. गृहिणींना आर्थिक बळ आणि बेरोजगारी भत्ता
विजय यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या पावलावर पाऊल ठेवत तामिळनाडूमधील गृहिणींना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच सुशिक्षित पदवीधरांना 400 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता जाहीर करून तरुणांना आकर्षित केले. इंटर्नशिपसाठी 5000 ते 8000 रुपयांचं विद्यावेतन आणि पाच लाख तरुणांसाठी 18000 रुपयांची रोजगार संबंधित सहाय्यता योजनेचे देखील त्यांनी आश्वासन दिले.
2. मोफत सिलिंडरचे आश्वासन
वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे 'अन्नपूर्णा सुपर सिक्स' योजनेतील आश्वासन महिला मतदारांच्या मनाला भिडल्याचे बोलले जात आहे.
3. 'अण्णन सीर थिट्टम' योजना
याव्यतिरिक्त विजय यांनी 'अण्णन सीर थिट्टम'योजनेदरम्यान बहिणी आणि मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोने आणि रेशमी साड्या दान करण्याचे वचन दिले.
4. शिक्षणासाठी 15 हजार रुपयांची मदत
पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 15 हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्याची घोषणा केली.
5. मोफत बस प्रवास
महिलांचा प्रवास सुकर आणि स्वस्त व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन देण्यात आले होते.
6. पेन्शन योजनेचा विस्तार

