Tamil Nadu Assembly Election Results 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे (Tamil Nadu Assembly Election Results) निकाल आज जाहीर होत असून राज्यातील राजकीय चित्र अत्यंत चुरशीचे झाले आहे.
यंदा चार प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत झाल्यामुळे निकालांचा (Tamil Nadu Assembly Election Results)अंदाज बांधणे कठीण झाले आहे. सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी मतमोजणीदरम्यान चित्र सतत बदलताना दिसत आहे. अशातच अभिनेता थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Tamil Nadu Assembly Election Results)
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ताज्या आकडेवारीनुसार एआयएडीएमके आघाडीवर आहे आणि तीन जागांवर पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर विजय यांचा टीव्हीके पक्ष असून त्यांच्या उमेदवारांना दोन जागांवर आघाडी मिळालेली आहे. याशिवाय डीएमके आणि सीपीआय प्रत्येकी एका जागेवर पुढे आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ताज्या आकडेवारीनुसार टीव्हीके 83 जागांवर, एडीएमके 58 जागांवर, डीएमके 34 जागांवर, पीएमके चार जागांवर, काँग्रेस तीन जागांवर, बीजेपी एका जागेवर आघाडीवर आहे.(Tamil Nadu Assembly Election Results)

या निवडणुकीत विजय यांनी स्वतः तिरुचिरापल्ली ईस्ट आणि पेरंबूर या दोन मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. तिरुचिरापल्ली ईस्ट मतदारसंघात विजय हे डीएमकेचे उमेदवार एस. निगोडी हृदयराज यांच्या पुढे असून त्यांना आतापर्यंत ३८७० मते मिळाली आहेत. मात्र पेरंबूर मतदारसंघात विजय यांना मोठा फटका बसताना दिसत असून ते येथे मागे आहेत. या मतदारसंघात किमान १२ उमेदवार विजय यांच्या पुढे असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने स्वतःला राज्यातील परिवर्तनाची ताकद म्हणून मांडले होते. पारंपरिक द्रविड पक्षांपासून कंटाळलेल्या मतदारांना आकर्षित करण्यात आपण यशस्वी झाल्याचा पक्षाचा दावा आहे. आज जाहीर होणारे निकाल केवळ पुढील सरकार ठरवणार नाहीत, तर राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा देखील निश्चित करणार आहेत.

