Dailyhunt
Tamilnadu Election Result 2026: थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!

Tamilnadu Election Result 2026: थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!

ABP माझा 1 week ago

Tamilnadu Election Result 2026: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. ताज्या ट्रेंडनुसार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांच्या कोलाथूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

प्राथमिक ट्रेंडनुसार, अभिनेता विजय यांचा पक्ष, टीव्हीके, अंदाजे 88 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन मतदारसंघात पिछाडीवर आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, टीव्हीके 28 जागांवर आघाडीवर आहे. एआयडीएमके 32 जागांवर, तर डीएमके 14 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये, एलडीएफ 38 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, यूडीएफ बाजी पलटवत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस-समर्थित यूडीएफने 98 जागांवर आघाडी मिळवली आहे.

आसाममध्ये, भाजप 73 जागांवर आणि पुदुचेरीमध्ये, भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये, डीएमके 46 जागांवर आघाडीवर आहे.एक्झिट पोलनुसार, आसाममध्ये हिमंता बिस्वा सरकार सरकार सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूमध्ये डीएमके सत्ता राखली जाईल असा अंदाज होता. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सत्तापालट करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुदुचेरीमध्ये एनडीए आघाडी पुनरागमन करण्याच्या तयारीत दिसत आहे.

केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे सात मंत्री पिछाडीवर

मतमोजणी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे सात मंत्री पिछाडीवर आहेत. मंत्री वीणा जॉर्ज, एम. बी. राजेश, ओ. आर. केलू, आर. बिंदू, जे. चिंचुरानी, ​​पी. राजीव, के. बी. गणेश कुमार आणि रोशी ऑगस्टीन हे मतमोजणीच्या पहिल्या तासात आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर होते. वृत्तांनुसार, काँग्रेस-यूडीएफ सुमारे 98 जागांवर आघाडीवर होती, तर सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफ 38 जागांवर आघाडीवर होती.

थरूर म्हणाले, कल आमच्या बाजूने दिसू लागला

काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले, आनंददायक बाब ही आहे की, पहिल्या सव्वा तासातच आमच्या बाजूने एक स्पष्ट कल दिसत आहे आणि एलडीएफचे काही लोकप्रिय नेतेसुद्धा मागे पडत आहेत. मला वाटते की केरळच्या मतदारांचे अभिनंदन केले पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे. बदलाची वेळ आली आहे, हे त्यांनी ठरवले आहे. आणि ज्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेबद्दल आम्हाला शंका नाही, तेसुद्धा मागे पडत आहेत. मला वाटते की हे एक खूप चांगले लक्षण आहे. आणि आम्ही यूडीएफमध्ये इतक्यात जल्लोष करणार नाही. पण मला दिसत आहे की, परिस्थितीत लक्षणीय बदल दिसण्यापूर्वी एका मोठ्या उलथापालथीची गरज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha