Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: 2026 हे वर्ष तामिळनाडूच्या (Tamil Nadu Election Results 2026) राजकारणात (Politicle Updates) एक ऐतिहासिक वर्ष म्हणून नोंदवलं जाईल.
4 मे रोजी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या (Tamil Nadu Assembly Elections Result) निकालांमध्ये अभिनयातून निवृत्ती घेऊन राजकारणात एन्ट्री घेतली. अभिनेत्यानं स्वतःचा पक्ष काढला आणि पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापितांना पळता भुई थोडी करुन सोडलं. अभिनेता थलपती विजय (Actor Thalapathy Vijay) याच्या 'तमिलगा वेट्टी कड़गम' (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षानं एक बलाढ्य शक्ती म्हणून 2026 च्या निवडणुकांमध्ये आपली छाप सोडली. या निवडणुकीत, थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळालं. आपल्या पहिल्याच निवडणुकीत पक्षानं बहुमत मिळवलंय.
स्वतः स्थापन केलेल्या पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना, थलपती विजय यानं एक अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच आता एक भलतीच चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे थलपती विजयवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय, तर दुसरीकडे त्याच्यासंदर्भातलं इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चर (England Cricketer Jofra Archer) याचं एक जुनं ट्वीट व्हायरल होत आहे.
इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चर याचं VIRAL ट्वीट नेमकं काय? (Jofra Archer Viral Tweet)
2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये 'विजय थलपती' यांच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर, इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचं 11 वर्षांपूर्वीचं एक ट्वीट पुन्हा समोर आलं आहे. ट्विटरवर आर्चरनं केलेलं "Vijay wtf" हे ट्वीट पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांसाठी जोप्रा आर्चरचं ट्वीट आधीच तयार असतं, असा दावा नेटकरी करत आहेत.

10 वर्षांपूर्वी जोप्रानं का केलेलं 'ते' ट्वीट नक्की कुणासाठी? (England Cricketer Jofra Archer Tweet)
25 एप्रिल 2015 रोजी, चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स XI पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान केलेलं जोप्रा आर्चर याचं ट्वीट, मुरली विजयला उद्देशून होतं. त्यावेळी, मुरली विजय किंग्स XI पंजाबकडून खेळत होता आणि त्यानं अत्यंत संथ फलंदाजी केली होती. 193 धावांचा पाठलाग करताना, पंजाबचा संघ त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्सच्या बदल्यात केवळ 95 रन्स करू शकला. पंजाबकडून मुरली विजय टॉप स्कोअरर होता, ज्यानं 32 बॉल्समध्ये 34 रन्स केलेले. आर्चरनं मुरली विजयबद्दल टीकात्मक सुरात ट्वीट केलं होतं.
तेच ट्वीट आता पुन्हा व्हायरल होत आहे, पण यावेळी जोफ्राचं ट्वीट एका पॉजिटिव्ह वेनं व्हायरल होत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 'थलपथी' विजयनं धमाकेदार कमगिरी केली. लोक जोफ्राचं ट्वीट थलपती विजयच्या विजयाचं भाकीत असल्याचं बोलत आहेत. दरम्यान, वस्तुस्थिती तशी मुळीच नव्हती. हे ट्वीट 10 वर्षांपूर्वीचं आहे. योगायोगानं, सध्या आयपीएल (IPL) सुरू आहे आणि आर्चर 'राजस्थान रॉयल्स' संघाकडून खेळतोय.

ज्या वेळी हे ट्वीट केलं गेलं होतं, त्यावेळी आर्चर आयपीएलमध्ये खेळत नव्हता, तो आयपीएलमध्ये खूप नंतर सामील झाला. आर्चरनं, अनेक वर्षांपूर्वीच या 'लँडस्लाइड' विजयाची पूर्वसूचना दिली होती, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. आर्चरच्या जुन्या वक्तव्यांचा सध्याच्या घडामोडींशी संबंध जोडण्याची ही काही पहिली वेळ नाही, यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. जोफ्राचे अनेक ट्वीट्स असे व्हायरल होत असतात.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

