Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Toxic Box Office Collection: इंटिमेट सीन्स, Action अन् तगडी स्टारकास्टची जादू चालली नाही; 'टॉक्सिक'च्या कमाईत घट, मंगळवारी किती कमावले?

Toxic Box Office Collection: इंटिमेट सीन्स, Action अन् तगडी स्टारकास्टची जादू चालली नाही; 'टॉक्सिक'च्या कमाईत घट, मंगळवारी किती कमावले?

ABP माझा 6 days ago

Toxic Box Office Collection Day 7: 'टॉक्सिक' (Toxic) या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीपासून प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण केली होती. यश स्टारर या सिनेमाच्या ट्रेलरने (Yash) प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.

या गँगस्टर ड्रामा सिनेमाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवून बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 7 दिवस पूर्ण केले आहेत. ओपनिंग डेला (Box Office Collection) या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी, झपाट्याने या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीही सिनेमाला 10 कोटी सुद्धा कमावता आले नाही. दरम्यान, सातव्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

विकेंडनंतर 'टॉक्सिक' सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट (Toxic Box Office Day 7 Yashs Film)

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'टॉक्सिक' या सिनेमाने दमदार सुरूवात केली होती. ओपनिंग डेलाच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 100 कोटींहून अधिक कमाई केली. विशेष म्हणजे या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली आकडेवारी दिसून आली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'टॉक्सिक' या गँगस्टर ड्रामा सिनेमा पहिल्या दिवशी 101.110 कोटी रुपये कमावले. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 37.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं यावेळी दिसून आलं.

भारतात एकूण सात दिवसांत 'टॉक्सिक'ने किती कोटींचा गल्ला जमवला? (Yash Starrer Toxic Box Office Collection)

तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 27.20 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी 'टॉक्सिक'ने 25.15 कोटींचे कलेक्शन केले. यानंतर 'टॉक्सिक' सिनेमाच्या कमाईच्या आकड्याचा आलेख हा घसरताच पाहायला मिळाला. पाचव्या दिवशई 23 कोटी रुपये कमावले. मुख्य म्हणजे पहिल्या सोमवारी 'टॉक्सिक' या चित्रपटाची कामगिरी खालावली. या सिनेमाने 7.65 कोटींचे कलेक्शन केले. आता मंगळवारी 'टॉक्सिक' ने 3.83 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या सिनेमाने एकूण सात दिवसांत 269.52 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. दरम्यान, 'टॉक्सिक' या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र स्टोरीमुळे या सिनेमाच्या कमाईने मात खाल्ली.

इतर बातम्या:

Bhumi Pednekar on Delhi Case: धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली...

Author : भाग्यश्री कांबळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha