Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Uday Samant : पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा यापुढे खपवून घेणार नाही, उदय सामंत यांचा महेश शिंदेंचे नाव न घेत इशारा

Uday Samant : पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा यापुढे खपवून घेणार नाही, उदय सामंत यांचा महेश शिंदेंचे नाव न घेत इशारा

ABP माझा 1 week ago

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे 'राजे गटा'च्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली, तरी आता संपूर्ण 'राजे गट' अधिकृतपणे पक्षासोबत आला आहे.

या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

फलटणचा आमदार शिवसेनेचा होईल : उदय सामंत

फलटणमध्ये निंबाळकरसाहेब तुमच्यासारख्या मंडळीचा आम्ही पक्षासाठी वापर करुन घेतला पाहिजे. या मतदारसंघात रेडिमेड पक्ष वाढलेला मिळालेला आहे. तुम्ही यायच्या अगोदर संघटना काय होती ते आम्हाला माहिती आहे. तुमच्या येण्यानं, तुमच्या साहेबांवरच्या प्रेमामुळं आणि शिवसेनेत आल्यानं इथला आमदार शिवसेनेचा होईल, याची आम्हाला खात्री आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

उदय सामंत यांनी या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले. "काही मतदारसंघांमध्ये 'माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही' अशी भाषा काही लोक करत आहेत. मात्र, शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मक्तेदारी चालणार नाही, असं सामंत म्हणाले.

शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल, तर मी स्वतः आणि माजी खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही."यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेल्या छुप्या जवळीकतेवर बोट ठेवत "स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले

समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका असं म्हणत नाही. मात्र, ते संबंध शिवसेनेला बाधक ठरतील असे असू नयेत. ते संबंध आपल्या शिवेसना पक्षाला बाधक ठरणारे असू नयेत. मला काही तरी मिळणार आहे म्हणून पक्ष दावणीला बांधायचा हे आता चालणार नाही, असा इशारा उदय सामंत यांनी म्हटलं. फलटणमध्ये बोलताना उदय सामंत यांनी बाजूच्या मतदारसंघाचा उल्लेख केला यावरुन त्यांचा रोख कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे होता हे स्पष्ट झालं.

Author : वैभव बोडके

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha