Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Uddhav Thackeray Shivsena MLA Merge Eknath Shinde मोठी बातमी: ठाकरेंचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; तीन मंत्र्यांवर जबाबदारी, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा!

Uddhav Thackeray Shivsena MLA Merge Eknath Shinde मोठी बातमी: ठाकरेंचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; तीन मंत्र्यांवर जबाबदारी, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा!

ABP माझा 6 days ago

Uddhav Thackeray Shivsena MLA Merge Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. आगामी नवरात्रीच्या आधी शिवसेना ठाकरेंचे (Shivsena UBT) 14 आमदार शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde) पक्ष प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे.

या 14 आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर देण्यात आली आहे, अशी माहितीही शिंदेसेनेतील बड्या नेत्याने दिली आहे. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 20 आमदार आहेत. या 20 आमदारांपैकी 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असलेल्या 20 आमदारांपैकी कोणते 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde )

कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची (Opration Tiger) जबाबदारी देण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याने दिली आहे. या 14 आमदारांपैकी 6 आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. यापैकी काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहितीही समोर आली आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्ष प्रवेश झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

यापूर्वी नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तो धक्का ताजा असताना आता ही नव्याने चर्चा सुरु झाल्याने ठाकरेंची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरेंच्या 20 आमदारांची यादी- (Shivsena UBT MLA List)

  1. मेहकर- सिद्धार्थ खरात
  2. दर्यापूर - गजानन लवाटे
  3. बाळापूर - नितीन देशमुख
  4. वणी - संजय देरकर
  5. परभणी - राहुल पाटील
  6. विक्रोळी - सुनील राऊत
  7. जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
  8. दिंडोशी - सुनील प्रभू
  9. वर्सोवा - हरुन खान
  10. कलिना - संजय पोतनीस
  11. वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
  12. माहीम - महेश सावंत
  13. वरळी - आदित्य ठाकरे
  14. शिवडी - अजय चौधरी
  15. भायखळा - मनोज जामसूतकर
  16. खेड आळंदी - बाबाजी काळे
  17. उमरगा - प्रवीण स्वामी
  18. उस्मानाबाद - कैलास पाटील
  19. बार्शी - दिलीप सोपल
  20. गुहागर - भास्कर जाधव

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का- (Eknath Shinde Shivsena Opration Tiger)

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले होते. त्यानंतर आता पुन्हा 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकलेले ठाकरेंचे 20 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचे कोणते खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले? (Opration Tiger Shivsena MP)

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha