Ulhasnagar Crime News : उल्हासनगर मधील एका बांधकाम व्यवसायिकाचे 50 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांच्या विशेष पथकाने व्यवसायिकाची सुटका (Ulhasnagar Crime News) करून एकाला अटक केली.
अपहरणादरम्यान रेकी करणारे अन्य दोन अपहरणकर्ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेत. दरम्यानया सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलिसांचा (Ulhasnagar Police) तपास सुरू आहे. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीअसूनयातीलसूत्रधारशोधूनकाढणंआता पोलिसांपुढचंआव्हानअसणारआहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, उल्हासनगरमधील नामांकित बांधकाम व्यवसायिक आणि इस्टेट एजंट जयराम नेहलानी यांचे सोमवारी सकाळी भर दिवसा अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आठ तासात अपहरण नाट्याचा छडा लावला. खडवली येथून नेहलांनी यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. अपहरणा दरम्यानची रेकी गोल मैदानातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Ulhasnagar Crime News : भर दिवसा घडलेल्या या हाय प्रोफाईल अपहरणाचाथरार
यात पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या इसमांनी नेहलांनी यांना जबरदस्तीने गाडीत घालून पळवून नेले. भर दिवसा घडलेल्या या हाय प्रोफाईल अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त खबरीच्या आधारे पोलिसांनी खडवली परिसरातून नेहलांनी यांची सुरक्षित सुटका केली. पोलिसांचा ससेमेरा पाठीमागे लागल्याचे पाहून आरोपींनी गाडी सोडून पळ काढला. त्यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. नेहलांनी यांच्या सुटकेसाठी 50 लाखांची खंडणी त्यांच्या कुटुंबाकडे मागण्यात आली होती.
Ulhasnagar Crime News : सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी गाडीची नंबर प्लेट बदलल्याचा संशय
आरोपींनी पोलिसांच्या तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आणि सीसीटीव्ही कॅमेरा पासून वाचण्यासाठी गाडीची नंबर प्लेट बदलल्याचा संशय आहे. यामागे एखादी टोळी आहे की व्यावसायिक वैमनस्य याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : विकास माने

