Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, 'कर्मा...'

Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, 'कर्मा...'

ABP माझा 6 days ago

Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: सध्या इंडस्ट्रीत घटस्फोट (Divorced) घेण्याचा ट्रेंड आलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या संसाराचा 'दी एन्ड' केलाय.

काही दिवसांपूर्वीच मराठी इंडस्ट्रीतलं पॉवर कपल वेगळं झालंय. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि ऊर्मिला कानेटकर (Urmilla Kanetkar) यांनी घटस्फोट घेतला आहे. आदिनाथ आणि ऊर्मिला कानेटकर (Adinath Kothare Urmilla Kanetkar Getting Divorce) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. पण, आता घटस्फोटानंतर उर्मिलानं केलेल्या क्रिप्टीक पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर (Actress Urmilla Kanetka) यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे. मराठी इंडस्ट्रीतल्या (Marathi Film Industry) पॉवर कपलचा संसार मोडल्यानं अनेकांना धक्का बसला. अशातच घटस्फोटाच्या 21 दिवसांनी मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केलीय.

अभिनेत्री उर्मिला कानेटकर पोस्टमध्ये काय म्हणालीय? (Urmila Kanetkar Cryptic Post)

उर्मिलानं आपल्या इन्स्टा स्टोरीवरच्या पोस्टवर लिहिलंय की, "परिस्थिती हाताळण्याची कर्माची एक धक्कादायक अन् अनोखी पद्धत असते. तुम्हाला फक्त शांतपणे बसून ते पाहायचे असते..."

महत्त्वाची बाब म्हणजे, उर्मिला कानेटकरनं आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही, तसेच ना त्यांनी कोणत्याही घटनेचा उल्लेख केलाय. त्यामुळे

उर्मिला कानेटकरनं पोस्टमध्ये कोणाचंही नाव किंवा कोणत्याही घटनेचा थेट उल्लेख नसला तरी सोशल मीडियावर तिच्या या संदेशाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, हा संदेश तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अलीकडील घडामोडींशी संबंधित असू शकतो. मात्र, याबाबत उर्मिलानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

अमृता खानविलकरच्या घटस्फोटाच्या चर्चा, सत्य नेमकं काय? (Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorced Rumors)

इंडस्ट्रीतील कधीकाळचं पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे मराठमोळी अमृता खानविलकर आणि तिचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघेही गेल्या 18 वर्षांपासून एकमेकांपासून विभक्त राहत असल्याचं बोललं जात आहे.

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha