मुंबईत शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. या पावसात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या परिसरातील आहे.
याठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. वंदे भारत ट्रेन या पाण्यातून वेगाने जात होती.
ट्रॅकवर साचलेल्या पाण्यातून वंदे भारत ट्रेन वेगाने गेल्यामुळे पाण्याचा मोठा फवारा हवेत उडाला.
पाण्याचा हा फवारा 25 फुट वर असलेल्या उड्डाणपुलावरील गाड्यांपर्यंत पोहोचला.
वंदे भारत ट्रेनचा ब्रीजवरील गाड्यांवर पाणी उडवतानाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

