Varun Dhawan Film Song Controversy: बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून जुन्या लोकप्रिय गाण्यांना थोडा नवा टच देऊन वापरण्याचा ट्रेंड सर्रास सुरू असतो. जुन्याच चालीचं गाणं नव्या पद्धतीने लावणं हे तर नेहमीचच झालं आहे.
पण, वरूण धवनच्या (Varun Dhawan) आगामी 'है जवानी तो इश्क होना है ' ( Hai Jawani Toh Ishq Hona hai) या चित्रपटात वापरलेल्या एका गाण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. निर्माते वाशू भगनानी त्यांच्या पूजा एंटरटेनमेंटने उच्च न्यायालयात 400 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.1999 मधील सुपरहिट चित्रपट 'बीवी नंबर 1 ' या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांच्या वापरावरून हा वाद उफाळला आहे. ही गाणी चित्रपटातून हटवली नाहीत तर, चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे डेव्हिड धवन दिग्दर्शित 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर निर्मात्यांना फटका बसू शकतो. ( Mumbai Highcourt)
Varun Dhawan Film Controversy: नेमका वाद काय ?
1999 मधील सुपरहिट चित्रपट 'बीवी नंबर 1 ' मधील लोकप्रिय गाण्यांच्या वापरावरून हा वाद सुरू आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात 'चुनरी चुनरी ' आणि 'इश्क सोना है ' या गाजलेल्या गाण्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप पूजा इंटरटेनमेंटने केला आहे. या गाण्यांचे वापर करण्याचे वैध अधिकार नसल्याचा दावा करत निर्माते वाशू भगनानी यांनी थेट कायदेशीर लढाई सुरू केली आहे. त्यांनी न्यायालयात तातडीचा दिलासा मागितला असून ही वादग्रस्त गाणी चित्रपटातून हटवली नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. यात थिएटर रिलीज, वितरण आणि ओटीटी रिलीजवरही निर्बंध घालण्याची विनंती करण्यात आली आहे. एवढंच नाही तर संबंधितांवर थेट मुंबई उच्च न्यायालयात 400 कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आलाय.
विशेष म्हणजे या खटल्यात केवळ 400 कोटींचा नव्हे तर अतिरिक्त 100 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावाही करण्यात आला आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांबाबत स्पष्टता नसताना गाण्यांचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे. पूजा इंटरटेनमेंटच्या वकिलांनी सांगितले की, ' पूर्वीच्या करारांमध्ये केवळ ऑडिओ राइट्सचे उल्लेख होते .2018 मध्ये टिप्स कडून विजवल राईट साठी संपर्क साधण्यात आला होता, मात्र अंतिम करार झालेला नाही. त्यामुळे सध्याचा वापर अधिकाऱ्यांच्या बाहेर आहे. असा युक्तिवाद त्यांनी केला. त्याचबरोबर पूर्वी दिलेले काही ऑडिओ हक्क रद्द केल्याची नोटीसही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Varun Dhawan Film Controversy: वरूण धवनच्या सिनेमाला फटका बसणार?
अभिनेता वरून धवन पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत असलेल्या 'है जवानी तो इश्क होना है' हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या तोंडावर कायदेशीर नुकसान भरपाईचे दावे दाखल केले गेल्यामुळे चित्रपटाला फटका बसण्याची चिन्हे असल्याचं म्हटलं जात आहे.
.
Author : abp majha web team

