Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Veen Doghantli Hi Tutena Purniemaa Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर; ऑनस्क्रिन नवऱ्यानं शेअर केलाय VIDEO

Veen Doghantli Hi Tutena Purniemaa Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर; ऑनस्क्रिन नवऱ्यानं शेअर केलाय VIDEO

ABP माझा 4 months ago

Veen Doghantli Hi Tutena Purniemaa Dey: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघांची ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) अल्पावधीतच प्रसिद्ध झालीय. मालिकेत समर आणि स्वानंदीची हळुवारपणे खुलणारी लव्हस्टोरी प्रेक्षकांना भलतीच आवडतेय.

काही दिवसांपूर्वी मालिकेत एक ट्वीस्ट आलेला. समरची जुनी मैत्रीण किमयाच्या येण्यामुळे स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. एका पार्टीत दारू पिऊन स्वानंदी समरसमोर तिच्या मनातील भावना, प्रेम भडाभडा बोलून टाकते. पण, इथेही ट्वीस्ट आहेच. समरला वाटतं स्वानंदी दारू प्यायलीय, त्यामुळे बडबडतेय आणि तो तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण आता स्वतः समर प्रेमाची कबुली देणार आहे. मालिकेत स्वानंदीची भूमिका तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिनं आणि समरची भूमिका सुबोध भावेनं (Subodh Bhave) साकारली आहे. या दोघांसोबतच मालिकेतली इतर पात्रंही चर्चेत असतात.

'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत स्वानंदी, समरसोबतच इतर पात्रही लक्ष वेधून घेतात. या मालिकेत स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरासुद्धा चर्चेत असतात. कारण, त्या दोघांच्या नात्यावरच स्वानंदी आणि समरच्या नात्याचा पाया रोवला गेलाय. रोहन आणि स्वानंदी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तर, समर आणि अधिरा उच्चभ्रू कुटुंबातले आहेत. अधिरा आणि रोहन एकमेंकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. दोघांनी एकमेकांच्या घरी सांगितल्यावर सर्वात आधी कुटुंबाचा गोंधळ उडतो. पण, दोघांच्या लग्नाला सारे तयार होतात. तेवढ्यात रोहन सर्वांसमोर अट ठेवतो की आधी त्याच्या बहिणीचे स्वानंदीचे लग्न झाले पाहिजे. त्यानंतर परिस्थिती अशी निर्माण होते की समर, स्वानंदी यांना एकमेकांशी लग्न करावं लागतं.

जिच्या पायाशी सारी सुखं लोळण घेत होती, ती अधिरा रोहनशी लग्न करुन मध्यमवर्गीय कुटुंबाची सून होते आणि मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली स्वानंदी श्रीमंत समर राजवाडेंची बायको होते. मालिकेत स्वानंदीचा भाऊ रोहनची भूमिका अभिनेता राज मोरे यानं साकारली आहे. तर, अधिराची भूमिका अभिनेत्री डॉक्टर पूर्णिमा डे हिनं साकारली आहे. 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेतली अधिराच्या पायाला खऱ्या आयुष्यात मोठी दुखापत झाली आहे. तिचा व्हीलचेअरवरचा फोटो रोहननं म्हणजे, राज मोरेनं शेअर केला आहे.

अभिनेता राज मोरेनं शेअर केलाय VIDEO

राज मोरेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज आणि पाय फ्रॅक्चर असलेली पूर्णिमा मस्ती करताना दिसत आहेत. पूर्णिमा व्हीलचेअरवर बसलीय आणि ती व्हीलचेअर राज मोरेनं पकडलीय. व्हीलचेअर पुढे नेण्यासाठी तो मदत करतो. पण, मध्ये मुद्दाम तो व्हीलचेअर सोडून देतो. पूर्णिमाच्या एका पायाला दुखापत झाली असून त्यामुळेच डॉक्टरांनी पायाला प्लास्टर केलंय. व्हिडीओ शेअर करताना राजने लिहिले की तिचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी चालवत असलेल्या व्हीलचेअरवर ती बसली आहे. अभिनेता राज मोरेनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांना पूर्णिमाची काळजी वाटतेय. तसेच, अनेकांनी शंका व्यक्त केलीय की, हिच्या पायाला खरंच लागलंय की, मालिकेसाठी नाटक आहे.

Veen Doghatli Suchena Promo: 'वीण दोघातली तुटेना ' मालिकेत नवा ट्विस्ट; समर देणार स्वानंदीला प्रेमाची कबुली; Zee मराठीचा प्रोमो व्हायरल

ABP माझाच्या बातम्या LIVE...

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha