Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट

Veen Doghatli Tutena: स्वानंदीच्या हाती लागला चिंगीचा 'तो ' रिपोर्ट; स्वानंदी भरल्या मांडवात मोडणार अंशुमन लग्न, वीण दोघातही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट

ABP माझा 2 weeks ago

Veen Doghatali Tutena: झी मराठीवरील 'वीण दोघातली तुटेना' (Veen Doghatli Tutena) मालिकेत सध्या प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्वानंदी समोरच्या आयुष्यात एकीकडे प्रेमाचे वारे वाहत असताना दुसरीकडे काकू आणि अंशुमनची कटकारस्थाने सुरुच आहेत.

चिंगीला प्रेमाची वचनं देत आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायला अंशुमन तयार झाला आहे. पण, स्वानंदीला या सगळ्या प्रकाराचा सुगावा लागलाय त्यामुळे ती या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्याची सध्या प्रचंड चर्चा आहे. स्वानंदीला चिंगी गरोदर असल्याचं कळालं आहे. तिच्या हातात प्रेग्नेंसी रिपोर्ट येताच तिला मोठा धक्का बसतो. शेवटी चिंगीच्या हाताला धरून ती मांडवात घेऊन येते आणि अंशुमनचे लग्न मोडते. सगळ्या घरादारासमोर ती अंशूमनचे बिंग फोडणार आहे.

झी मराठीचा प्रोमो व्हायरल

वीण दोघातली तुटेना मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच समर स्वानंदीला प्रपोज करतानाचा एक प्रोमो झी मराठीने शेअर केला होता. आता स्वानंदीला अंशुमन आणि चिंगीच्या नात्याविषयी धक्कादायक माहिती मिळाली आहे. चिंगी गरोदर असल्याचं तिला कळाल्याने स्वानंदी आधी घाबरून जाते. ती चिंगीला जाब विचारते. "चिंगी तू हे काय केलंस तुला कळतंय का ? ' असं विचारताच काहीच कळत नसल्याचं ती स्वानंदीला सांगते. त्यावर स्वानंदी तुझं लग्न लावून देऊया म्हणत चिंगीला थेट मांडवात घेऊन येते.मांडवात येते त्यावेळी अंशुमनच्या गळ्यात माळ पडत असते. पण, स्वानंदी हे लग्न नाही होऊ शकत, असं म्हणत सगळ्यांना थांबवते. या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. राजवाडे, आय एम सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत ' असं स्वानंदी म्हणताना दिसते. वीण दोघातली तुटेना मालिकेत आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

या प्रोमोखाली चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. आता मालिका पाहायला मजा घेणार अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत.स्वानंदी पुन्हा एकदा अंशुमनची बँड वाजवणार असं काही जण म्हणत आहेत. अनेक जण मालिकेत अधिरा खूप दिवस दिसत नसल्याचे म्हणत आहेत.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha