Vidarbha Heat Wave: देशासहराज्यातीलअनेकजिल्ह्यातउष्णतेच्यापाऱ्यानेजनजीवनअक्षरशःविस्कळीतकेलंआहे. राज्यातकुठे 45 तरकुठे 46 अंशापर्यंतपाऱ्यानेमजलमारलीआहे. अशातचगेल्याआठवड्याभरापासून विदर्भात पुन्हा उष्णतेचा हाहा:कार ( Vidarbha Heat Wave) बघायला मिळतो आहे . सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे.
अंगाची लाही-लाही करणारी उष्णतेची लाट अक्षरशः होरपळून काढतअसल्याचेचित्र आहे. अशातचनागपूरप्रादेशिकहवामानविभागाने विदर्भातीलबहुतांशजिल्ह्यासाठीउष्णतेच्यालाटेचाइशारादिलाआहे.
Vidarbha Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र, दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा
23 मे 2026:अकोला, अमरावतीसहवर्ध्यालातीव्रउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरयवतमाळ, नागपूर, चंद्रपूरलाउष्णतेचाऑरेंजअलर्टदेण्यातआलाअसूनतीव्रउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरतिकडेभंडारा, गोंदियाआणिगडचिरोलीलायलोअलर्टदेण्यात आलेअसूनयाठिकाणीउष्णतेचीलाटअसणारआहे.
24 मे 2026:अकोला, अमरावतीयवतमाळसहवर्ध्यालारेडअलर्टदेण्यातआलेअसूनयाशहराततीव्रउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरनागपूरआणिचंद्रपूरलाउष्णतेचाऑरेंजअलर्टदेण्यातआलाअसूनतीव्रउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरतिकडेभंडारा, गोंदियाआणिगडचिरोलीलायलोअलर्टदेण्यात आलेअसूनयाठिकाणीउष्णतेचीलाटअसणारआहे.
25 मे 2026:नंतरउष्णतेचीलाटकाहीप्रमाणतसौम्यहोण्याचीशक्यातआहे. अकोला, अमरावतीयवतमाळसहवर्ध्यालायादिवशीऑरेंजअलर्टदेण्यातआलेअसूनयाशहरातउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरनागपूर, गडचिरोलीआणिचंद्रपूरलाउष्णतेचायलोअलर्टदेण्यातआलाअसूनउष्णतेच्यालाटेचाइशारादेण्यातआलाआहे. तरतिकडेभंडारा, गोंदियावाशिमआणिबुलढाण्याच्याकुठलाहीअलर्टनसणारआहे. संभाव्यउष्णतेचीलाटलक्ष्यातघेतानागरिकांनीखबरदारीघ्यावी, असेआवाहनकरण्यातआलेआहे.
Gondia: तब्बल 12 वर्षांनंतर गोंदिया जिल्ह्याचे तापमान विक्रमी अंशावर, शेतमजुराचा उस्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
मागील तीन-चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, उष्णतेने गेल्या 12 वर्षातील नीचांक मोडला आहे. सन 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्याचे तापमान 45.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर, तब्बल 12 वर्षांनी यंदा तापमानाचा पारा काल 45.2 अंशावर पोहोचला आहे. या भीषण उन्हाळ्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचे तीव्र आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे.
Gadchiroli: गडचिरोलीत अति उष्णतेची लाट जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर, इतिहासात उच्चांकी तापमानाची नोंद
गडचिरोलीच्या इतिहासात काल उच्चांची 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात अतिउष्णतेची लाट घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. उष्माघाताच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष 24 तास सुरू करण्यात आले आहेत. या विशेष कक्षांमध्ये कूलर, वातानुकूलित सुविधा, विशेष बेड आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आलाय. ओआरएस, आयव्ही फ्लूइड्ससह आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक सुविधा तयार ठेवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर दुर्गम भागात आशा स्वयंसेविकांमार्फत जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खबरदारी बाळगावी, आपत्कालीन मदतीसाठी 108 आणि 102 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : विशाल देवकर

