Vidarbha Rain Updates : राज्यभरात गेल्या 24 तासांपासून पावसाने (Maharashtra Rain) रौद्ररूप धारण केले असून अनेकभागात पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. याच दरम्यान बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी (Misalwadi) परिसरात अचानक झालेल्या ढगफुटी (Cloudburst) सदृश पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे . यात गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
ओढा आणि नदीला आलेल्या पुरामुळे मुख्य पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला. या संकटाच्या वेळी ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत पुलाच्या पलीकडे अडकलेल्या विद्यार्थी, महिला आणि शेतकऱ्यांना मानवी साखळीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, दरवर्षी पुलावरून पाणी वाहत असल्याने जीवितास धोका निर्माण होत असून प्रशासनाने पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Bhandara Gosikhurd Dam : गोसेखुर्दचे 6 दरवाजे कमी करून 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग
दुसरीकडेभंडाऱ्याच्या गोसेखुर्दचे 6 दरवाजे कमी करून 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाआहे. यातूनसध्या 1 लाख 873 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरुकरण्यातआलाआहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोबतच गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे काल भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले होते. मात्र, काल दिवसभर पावसाने उसंत घेतली आणि धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आल्यानं आज गोसेखुर्द धरण प्रशासनानं 33 पैकी 6 दरवाजे बंद करून 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे.
सध्या धरणाचे 27 अर्धा मीटरनं सुरू असून त्यातून 1 लाख 873 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस परिस्थिती नियंत्रणात राहिली तर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ही दुपारच्या सुमारास कमी करण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे.
Gondia Rain: गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे नालेसफाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; अनेकांच्या घरात घुसले पाणी
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ही ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सौंदड गावात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यामुळे अनेकांच्या घरी पाणी शिरले आहे. नालीतील पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने ग्रामपंचायत विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. तर अनेक ठिकाणी नालीतून काढलेला गाळ हा रस्त्यावर ठेवल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंचांनी याकडे लक्ष देऊन त्वरित नाले सफाई करावी, आणि रस्त्यावरचा गाळ साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत मध्ये आंदोलन करणार असा इशारा देखील सौंदड येथील नागरिकांनी दिला आहे.
Author : एबीपी माझा वेब टीम

