Dailyhunt
Video : रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?

Video : रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?

ABP माझा 1 week ago

Rajat Patidar angry at Umpire : गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने (RCB) रविवारी आयपीएलच्या 11व्या सामन्यात दमदार कामगिरी करत 43 धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

या हंगामातील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहा विकेट्सनी सामना जिंकला होता.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 250 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ची संपूर्ण टीम 207 धावांवर गारद झाली. या सामन्यातील एक वेगळीच घटना मात्र चर्चेचा विषय ठरली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाण्याच्या बाटलीवरून वाद

आरसीबीच्या डावादरम्यान ही घटना घडली. पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) फलंदाजी करत असताना ड्रिंक्स ब्रेकमध्ये मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि बॅटिंग कोच दिनेश कार्तिक मैदानात आले. त्याच वेळी एका अंपायरने पाटीदार यांची पाण्याची बाटली उचलून त्यातून एक घोट घेतला. ही गोष्ट पाटीदारच्या नजरेस पडताच त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि अंपायरकडे जाऊन बाटली परत मागितली. दरम्यान, दिनेश कार्तिक यांनीही अंपायरला जाब विचारत 'तुमचं पाणी कुठे आहे?' असा सवाल केला. या प्रसंगात अंपायर काहीसे गोंधळलेले दिसले, तर अँडी फ्लॉवर शांतपणे हा प्रकार पाहत उभे होते.

टिम डेव्हिडचं खास कौतुक

सामन्यानंतर कर्णधार पाटीदारने टिम डेव्हिडचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, 'टिम डेव्हिड हा स्पेशलिस्ट फिनिशर आहे. माझ्या मते तो जगातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी संघासाठी खूप महत्त्वाची ठरते. मागील हंगामातही त्याने अशीच उत्कृष्ट कामगिरी केली होती.'

RCB vs CSK IPL 2026 : आरसीबीचा पॉईंट्स टेबलवर कब्जा! थालाविना चेन्नई अनाथ, सलग 3 पराभवांचा कलंक, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं?

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha