Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?

ABP माझा 2 months ago

Vidhan Parishad Election 2026 अजय धनजे : राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 17 जागांसाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीच्या उमेदवारीसाठीजोरदार लॉबींग सुरुअसूनईच्छुकांचीमोठीरीघ लागल्या चेही चित्र आहे . परिणामी महाविकास आघाडी असो की महायुती, सगळीकडे च रस्सीखेच सुरु आहे . असे असता ना बहूतेक ठिकाणी विद्यमान आमदार, मंत्र्‍यांच्या मुला-मुलींचीच नावे समोर केली जात आहेत.

सुनील तटकरे, भरत गोगावले, प्रतापराव चिखलीकर, गुलाबराव पाटील, किशोर पाटील, अर्जुन खोतकर, महेंद्र दळवी इत्यादी नेत्यांच्या मुला-मुलींना विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून पक्षपातळीवर लॉबींग सुरू आहे.

असे असतानाया नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत निवडूण आणण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सध्या वाऱ्यावर सोडण्यात आल्याचं चित्र दिसतं आहे. खरतर विधानपरिषदेची निवडणूक अशा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असती जे पडद्यामागून पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतात आणि पक्षाला विधानसभा आणि लोकसभासह स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवून देतात. मात्र यावेळी विधानपरिषदेसाठी चित्र काही वेगळ आहे.

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?

ठाणे विधानपरिषद (Thane Vidhan Parishad Election 2026)

ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत किंवा भाजप सोबत जाऊन मविआच्या ठाकुरांकडून क्षितिज ठाकुरची सेटींग करण्यात येत आहे. तर शिंदेच्या रविंद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

--------------------------

जळगाव विधानपरिषद (Jalgaon Vidhan Parishad Election 2026)

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर शिवसेनेचा दावा करत आपला पुत्र प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून देखील मुलगा सुमीत पाटीलसाठी इच्छुक आसल्याची माहिती आहे.

--------------------------

Raigad, Ratnagiri, and Sindhudurg: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

खा. सुनिल तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे पुन्हा एकदा इच्छुक आहे. तर दुसरीकडे रायगड पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले हादेखील इच्छुक आहे.

--------------------------

Parbhani-Hingoli Legislative Council: परभणी-हिंगोली विधानपरिषद

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर मुलगा अभिमन्यू खोतकरसाठी इच्छुक आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी देवगीरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती

--------------------------

Chandrapur-Gadchiroli-Wardha:चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी वय एक महिना कमी भरत असल्याने माघार घेतली आहे.

परिवारवादावर टीका करणाऱ्यांकडूनच परिवारवाद होणार का?

खरतर कॉंग्रेस पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी असोत की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे परिवारवादाचा उल्लेख करत असतात. अशात विधानपरिषदेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना महायुतीकडून संधी देऊन नेत्यांच्या मुलांची लॉबींग भाजप आणि महायुती मोडून काढणार का? हे पहावं लागेलं. फक्त महायुतीच नाहीतर महाविकास आघाडी सुध्दा त्यांच्यावर केलेल्या परिवारवादाचा डाग पुसणार का हे महत्वाचं आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha