Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

ABP माझा 1 month ago

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी अखेर आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार आहे. मात्र, जवळपास सर्वच मतदारसंघात काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केलीय, तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकाच जागेसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मात्र, प्रमुख लढत ही महायुतीचे (Mahayuti) उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार यांच्यातच होणार आहे. सोलापूर ते संभाजीनगर आणि जळगाव ते नागपूरपर्यंत एकूण 17 मतदारसंघातील उमेदवारांची नावे आता समोर आली असून कोणत्या मतदारसंघात कोण प्रमुख उमेदवार आहेत, याची माहिती खाली देण्यात आली आहे.

महायुतीमध्ये भाजप 11 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदेंची शिवसेना 4 जागांवर मैदानात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात 2 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केल्यास, काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढवत आहे, ठाकरेंची शिवसेना 6 जागांवर उमेदवार देत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तीन मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे, या सर्व जागांवरील प्रमुख लढती आता निश्चित झाल्या असल्या तरी खरे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सोलापूर, अहिल्यानगर ठाणे ,जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग , नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली,अमरावती , धाराशिव-लातूर-बीड,परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर (पोटनिवडणूक)

राज्यातील 17 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण?

1. सोलापूर : काँग्रेस मविआचे आदित्य फत्तेपूरकर विरुद्ध भाजप महायुतीचे राजेंद्र राऊत

2. अहिल्यानगर - काँग्रेस मविआचे करण ससाणे विरुद्ध भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे

3. ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे अभिजीत पवार विरुद्ध शिवसेना महायुतीचे रविंद्र फाटक

4. जळगाव : शिवसेना ठाकरे मविआचे शरद तायडे विरुद्ध भाजप महायुतीचे नंदकिशोर महाजन

5. सांगली-सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे बाळासाहेब पाटील/अभयसिंह जगताप विरुद्ध भाजप धैर्यशील माने

6. नांदेड : काँग्रेस मविआचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर

7. यवतमाळ : काँग्रेस मविआचे साहेबराव कांबळे विरुद्ध शिवसेना महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी

8. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे श्रीकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे विक्रम काकडे

9. भंडारा-गोंदिया : काँग्रेस मविआचे दिलीप बनसोड विरुद्ध भाजप महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर

10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अनिकेत तटकरे

11. नाशिक : मविआचा उमेदवार नाही, अपक्ष विरुद्ध शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे

12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : काँग्रेस मविआचे शैलेश अग्रवाल विरुद्ध भाजप महायुतीचे अरुण लखानी

13. अमरावती : काँग्रेस मविआचे हर्षदीप देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे प्रवीण पोटे

14. धाराशिव-लातूर-बीड : काँग्रेस मविआचेचे महेश देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे बसवराज पाटील

15. परभणी-हिंगोली : शिवसेना मविआचे डॉ. विवेक नावंदर विरुद्ध शिवसेना महायुतीच सईद खान

16. छत्रपती संभाजीनगर-जालना - शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप किंवा शिवसेना

17. नागपूर (पोटनिवडणूक) : काँग्रेस मविआचे अतुल लोंढे विरुद्ध भाजप महायुतीचे डॉ. राजीव पोतदार

हेही वाचा

पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले

Author : महेश गलांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha