Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!

Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!

ABP माझा 4 months ago

Virat Kohli Video: आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध गुजरात टायटन्स अडचणीत सापडला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 15 षटकांत 105 धावा केल्या आणि 5 गडी गमावले.

कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, निशांत सिंधू, जोश बटलर आणि अर्शद खान बाद झाले आहेत. गिलने 12, साईने 10, निशांतने 20, बटलरने 19 णि अर्शद खानने 15 वा केल्या. बंगळूरकडून जोश हेझलवूडने 2 बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

किंग कोहलीने एकच जल्लोष केला

गुजरात टायटन्सची पहिली विकेट तिसऱ्या षटकात पडली. जोश हेझलवूडने कर्णधार शुभमन गिलला 10 धावांवर बाद करून आरसीबीला पहिले यश मिळवून दिले.गिलने शाॅर्ट बाॅलवर आपला आवडता पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने जास्त उसळी घेतली आणि तो हवेत उडाला. मिड-ऑफला उभ्या असलेल्या रजत पाटीदारने उजवीकडे धावत जाऊन एक अप्रतिम झेल घेतला. यानंतर किंग कोहलीने एकच जल्लोष केला. यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्माला सुद्धा भलताच आनंद झाल्याचे दिसून आले. गिलने एलिमेनटर सामन्यात किंग ठरला होता.

गुजरात टायटन्सची तिसरी विकेट आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडली. रसिक सलामने निशांत सिंधूला २० धावांवर बाद करून आरसीबीला यश मिळवून दिले. निशांत क्रीझच्या बाहेर आला होता, पण रसिकने शाॅर्ट चेंडू टाकला. फ्लॅट-बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट खोल क्षेत्ररक्षणात उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या हातात गेला. पडिक्कलने सीमारेषेजवळ एक सोपा झेल घेतला.

गुजरातने पॉवरप्लेमध्ये 2 विकेट गमावल्या

गुजरातने पॉवरप्लेमध्ये 2 विकेट गमावून 45 धावा केल्या. साई सुदर्शनने सलग दोन चौकार मारून डावाची सुरुवात केली आणि एकदा यशस्वी रिव्ह्यूमुळे यष्टीमागे झेलबाद झाल्यानंतर त्याला जीवदान मिळाले. शुभमन गिलने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एक शानदार चौकार मारला, पण जोश हेझलवूडने त्याला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वरने बाउन्सर टाकून सुदर्शनला (12) बाद केले.

बंगळूरूने नाणेफेक जिंकली

दुसरीकडे, बंगळूरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, "ही खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. मला वाटत नाही की सामन्यादरम्यान त्यात जास्त बदल होईल, त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या अनेक आठवणी इथे आहेत, पण आमचे संपूर्ण लक्ष हा सामना जिंकण्यावर आहे."

इतर महत्वाच्या बातम्या

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha