Watermelon Death Case Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा कलिंगड खाऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) घडली होती.
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात 'पेनकिलर-सदृश' (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. सदर घटनेनंतर डोकाडिया कुटुंबीयाने ज्या दुकानदाराकडून कलिंगड विकत घेतले होते. त्या दुकानदाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. सदर दुकानदाराच्या वडिलांसोबत एबीपी न्यूजने संवाद साधला. यावेळी त्यांनी चौकशी करायची असेल तर करा...अशी प्रतिक्रिया दिली.(Watermelon Death Case Mumbai)
कलिंगड विक्रेताचे वडील काय म्हणाले? (Watermelon Death Case Mumbai)
दुकानदाराचे वडील म्हणाले की, आमच्या कलिंगडमध्ये कोणताही दोष नव्हता. काही दोष नसतानाही आम्हाला आमचे दुकान बंद करण्यास भाग पाडले गेले आहे. सदर प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून माझ्या मुलाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आम्ही अनेक वर्षांपासून कलिंगड विकत आहोत आणि आजवर आम्हाला एकदाही कोणतीही तक्रार मिळाली नाही. आमची यात काहीही चूक नाही. या प्रकरणाला विनाकारणच खूप मोठे स्वरूप दिले गेले आहे. जर चौकशी करायची असल्यास, खुशाल करा...अशी प्रतिक्रिया कलिंगड विक्रेत्याच्या वडिलांनी दिली. सदर कलिंगडचे दुकान दक्षिण मुंबईतील नळ बाजार येथे आहे. सध्या चार व्यक्तींच्या मृत्यूबाबतची बातमी समोर आल्यापासून हे दुकान बंदच आहे.
नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
'याच' दुकानातून अब्दुल्ला डोकाडियांनी विकत घेतलेलं कलिंगड, मार्केटमधून आढावा, VIDEO:

