Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती.
या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात "पेनकिलर-सदृश" (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
सदर घटनेत आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, रविवारी उपचारादरम्यान जेजे रुग्णालय येथे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षांनुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सदर घटनेनंतर डोकाडिया कुटुंबीयाने ज्या दुकानदाराकडून कलिंगड विकत घेतले होते. त्या दुकानदाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
अब्दुल्ला असं या कलिंगड विक्रेताचं नाव असून पोलीस चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर डोक्यावर हात ठेवला.
तुला काही बोलायचे आहे का, असा सवाल माध्यमांशी केल्यानंतर अब्दुल्ला रागावल्याचे दिसून आले.
अब्दुल्लाने कॅमेऱ्यासमोर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
हातवारे करुन मला काहीच बोलायचे नाही, असं अब्दुल्लाने सांगितले.

