Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Weekly Horoscope: जून महिन्याचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! ग्रहांचे अद्भूत राजयोग, दत्तगुरूंचं पाठबळ, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: जून महिन्याचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! ग्रहांचे अद्भूत राजयोग, दत्तगुरूंचं पाठबळ, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

ABP माझा 1 week ago

Weekly Horoscope 1 To 7 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिना हा अनेकांचे भाग्य पालटणारा ठरत आहे, अशात 1 ते 7 जून 2026 हा आठवडा लवकरच येत आहे, ज्योतिषींच्या मते, हा आठवडा अनेकांसाठी प्रगतीकारक ठरणार आहे.

या आठवड्यात ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे काही राशींना करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील, तर काहींना खर्च आणि नातेसंबंधात संयम ठेवावा लागेल. विशेषतः ग्रहांच्या विविध राजयोगामुळे काही राशींना लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. जून महिन्याचा चा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी 1 ते 7 जून या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात घेतली जाईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा करिअरमध्ये स्थिरता मिळेल, पण निर्णय घेताना घाई टाळा. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. नातेवाईकांशी जुने मतभेद मिटतील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक राहील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्याचा भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रेम जीवनात आनंद मिळेल. प्रवासाचे योगही संभवतात.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. पैशांबाबत सावध राहा. भावनिक गोष्टींमध्ये अति विचार टाळा. आरोग्यासाठी योग्य आहार आणि झोप आवश्यक राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा भाग्याची साथ मिळाल्याने अनेक अडथळे दूर होतील. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. प्रेमसंबंध मजबूत होतील. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम ठेवणे महत्त्वाचे राहील. कामात बारकाईने लक्ष दिल्यास फायदा होईल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. गुंतवणुकीसाठी काळ मध्यम आहे. जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, त्यामुळे शांतता राखा.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. प्रेम जीवन रोमँटिक राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे संकेत आहेत. काही व्यक्तींची भेट होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्य आणि मेहनत दोन्हीची साथ मिळेल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण संयमाने मार्ग निघेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन संपर्क आणि ओळखीमुळे करिअरमध्ये फायदा होईल. व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसतील. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. अचानक प्रवासाचे योग संभवतात.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक राहू शकतो. कामात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य चांगले राहील, पण थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या..

हेही वाचा

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी, जून-डिसेंबर 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! 'या' महिन्यात टर्निंग पॉईंट...थक्क..

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha