Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, जूनचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, जूनचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

ABP माझा 5 months ago

Weekly Horoscope 1 To 7 June 2026: जून महिना आणि त्यासोबतच या महिन्याचा (June 2026) पहिलाच आठवडा लवकरच सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 1 ते 7 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे.

या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. जून महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी जूनच्या पहिल्याच आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या लाभाचे संकेत आहेत. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कामाच्या ठिकाणी संयमाने निर्णय घ्यावे लागतील. खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल. व्यवसायात स्थिर प्रगती दिसेल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा नवीन संधी आणि नवीन ओळखी या आठवड्यात लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. भावनिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्यासाठी योग्य आहार आणि विश्रांती आवश्यक राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा भाग्याची साथ मिळाल्याने अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगती आणि मान-सन्मान मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेम जीवनात गोडवा वाढेल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात संयम आणि मेहनत महत्त्वाची ठरेल. कामात बारकाईने लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल.

हेही वाचा

Horoscope Today 29 May 2026: आज शुक्रवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराची डबल कृपा, सुख आले..आजचे राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha